Tue, May 26, 2020 09:25होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती सुधारतेय : प्रभू 

मुख्यमंत्री पर्रीकरांची प्रकृती सुधारतेय : प्रभू 

Published On: Oct 22 2018 1:44AM | Last Updated: Oct 22 2018 12:45AMमडगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सुधारत आहे. लवकरच ते या आजारातून पूर्णपणे बरे होणार असून पूर्वीप्रमाणे राज्याचा कारभार हाती घेणार आहेत, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. मडगावात रविवारी एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या भेटीत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्री सुरेश प्रभू एका खासगी कामाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांसमवेत गोव्यात आले होते. मडगावला दिलेल्या भेटीवेळी त्यांच्यासोबत  त्यांची पत्नी देखील   होती. प्रभू यांचे  मडगावात  हौसिंग बोर्ड येथील डॉ. गायतोंडे  हे नातेवाईक आहेत.प्रभू यांनी आपल्या खासगी दौर्‍यात  मोंत हिल येथील एका हॉटेल ला भेट दिली.यावेळी भाजप मंडळाचे शर्मंद रायतुरकर तसेच साईश राजाध्यक्ष यांनी त्यांचे स्वागत केले. प्रभू यांनी त्यांच्या आवडीच्या गोमंतकीय भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती राजध्यक्ष यांनी दिली. शर्मंद रायतुरकर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मुख्यमंत्री मनोहर परीर्र्कर यांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. ते आजारातून पूर्ण पणे बरे होऊन पूर्वीप्रमाणे जोमाने कामाला लागतील, अशी सर्वाना खात्री आहे, असे ते म्हणाले. पर्रीकर केंद्रात सरंक्षण मंत्री असताना सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते त्यावेळच्या गोष्टींना प्रभू यांनी उजाळा दिला.