Tue, May 26, 2020 04:23होमपेज › Goa › 'निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची'

'निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची'

Published On: Apr 16 2019 6:29PM | Last Updated: Apr 16 2019 6:29PM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात होणार्‍या लोकसभा तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचे समोर आले आहे. लोकसभेसाठी रिंगणात उतरलेल्या 12 उमेदवारांपैकी तीन तर तीन मतदारसंघांमध्ये होणार्‍या पोटनिवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या 16 पैकी तीन उमेदवारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. या उमेदवारांच्या विरोधात गुन्हे नोंद असल्याची माहिती एडीआर संस्थेचे गोवा समन्वयक भास्कर असोल्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

असोल्डेकर म्हणाले, त्याचबरोबर  तीन मतदारसंघांमध्ये  होणार्‍या पोटनिवडणूकीतील 16 पैकी 10 उमेदवार हे करोडपती आहेत. यात प्रथम स्थानावर अपक्ष उमेदवार जीत आरोलकर हे असून त्यांची मालमत्ता 26 कोटी रुपये इतकी  प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहेत. त्यामागून  शिरोडयाचे मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर असून त्यांची मालमत्ता  16 कोटी रुपये इतकी आहे. करोडपती उमेदवारांच्या पहिल्या दहांमध्ये सर्वात अखेरच्या स्थानावर  म्हापसाचे उमेदवार जोशुओ डिसोझा आहेत. त्यांची मालमत्ता 1 कोटी रुपये इतकी असल्याचेही त्यांनी  सांगितले.