Fri, May 29, 2020 21:06होमपेज › Goa › पर्रीकरांचा सार्‍यांनाच सुखद धक्‍का

पर्रीकरांचा सार्‍यांनाच सुखद धक्‍का

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मुंबईला लीलावती इस्पितळात उपचारासाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत दाखल होऊन सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला.  मुख्यमंत्री पर्रीकर गुरुवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास विशेष विमानाने दाबोळी विमानतळावर दाखल झाले.  त्यांच्या  आगमनाबाबतची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी सरकारी वाहन, पोलिस फौजफाटा या गोष्टी टाळून ते  एका खासगी वाहनातून  पणजीला दाखल झाले.

पणजीतील शासकीय निवासस्थानी थोडी विश्रांती घेतल्यानंतर पर्रीकर दुपारी 2 वाजता विधानसभा सभागृहात आले. आधी काही उच्च सरकारी अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या सर्व सहकारी मंत्र्यांसोबत पर्रीकर यांनी आपल्या कक्षात 2.30 वाजता बैठक घेऊन त्यात अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता घेतली. अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात अर्थसंकल्प मांडून सभागृहाची मान्यता घेण्यात आली. पर्रीकर यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत, असा सल्ला त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.