Tue, May 26, 2020 05:19होमपेज › Goa › रस्त्यावर लघवी करू नका; गोव्यात स्वागत आहे

रस्त्यावर लघवी करू नका; गोव्यात स्वागत आहे

Published On: Feb 15 2018 1:24PM | Last Updated: Feb 15 2018 1:36PMगोवाः पुढारी ऑनलाईन

रस्त्यावर लघवी करू नका, तुमचे गोव्यात स्वागत आहे असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. गोव्यात देश-विदेशातून पर्यटक येत असतात त्यामुळे गोव्याच्या सार्वजनिक व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो असतो. काही पर्यटकांच्याकडून रस्त्यावर दारू पिणे, लघवी करणे, अश्लील कृत्य करणे असे प्रकार घडतात.

याबाबत गोव्याच्या नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी रस्त्यावर लघवी करणारे हे पर्यटक म्हणजे पृथ्वीतलावरचा ‘मळ’ आहेत, असे म्हटले होते. गोव्यात गैर वागणार्‍या उत्तर भारतीयांना गोव्याचे हरियाणा बनवायचे आहे काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला होता.

याबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, गोव्यात पर्यटकांचे स्वागत आहे. मात्र, रस्त्यावर लघवी करण्यासारखे प्रकार करू नका. दरवर्षी गोव्याला 6 कोटी 50 लाखांहून अधिक देशी पर्यटक भेट देतात. त्यांच्याकडून असे गैरकृत्य होत असल्याने त्याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत गोव्यातील लोकांनीही काळजी घ्यावी. 

संबधित बातम्याः

हरियाणा मुख्यमंत्र्यांची पर्रीकरांकडे तक्रार

मुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर