Wed, May 27, 2020 18:53होमपेज › Goa › 'विदेशात बोटींवर अडकून पडलेल्या खलाशांना मायदेशी आणा'

'विदेशात बोटींवर अडकून पडलेल्या खलाशांना मायदेशी आणा'

Last Updated: Apr 06 2020 1:52PM

खलाशांच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडे मागणी पणजी : पुढारी वृत्तसेवा 

विदेशात अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी कामत यांनी खलाशांचा विषय पंतप्रधान कार्यालय तसेच  परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे मांडला. त्यांनी मदतीचे आश्‍वासन दिले, अशी माहिती कामत यांनी दिली आहे. 

सहा हजारांपेक्षा अधिक गोमंतकीय खलाशी सध्या विदेशात बोटीवर अडकून पडले आहेत. कोरानामुळे खलाशी आपल्या मायदेशी परतण्यास अडचण येत आहे. त्यामुळे याप्रश्‍नी त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी वारंवार या खलाशांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

वाचा -साताऱ्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना दणका! 

खलाशी संघटनेचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांच्या अध्यक्षतेखाली खलाशांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. कोरोनामुळे विदेशात बोटींवर अडकून पडलेल्या खलाशांना मायदेशी आणा, अशी मागणी यावेळी खलाशांच्या कुटुंबीयांनी केली. त्यानुसार, या खलाशांच्या संदर्भात आपण केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक तसेच अनिवासी भारतीय आयुक्‍त अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांच्याशी चर्चा केली. तसेच सदर विषय पंतप्रधान कार्यालय तसेच विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याकडेदेखील मांडावा, अशी मागणी केली, असे  विरोधी पक्षनेते कामत यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

वाचा - CoronaLive : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८०० च्या घरात