Tue, May 26, 2020 09:43होमपेज › Goa › विद्यार्थ्याकडून लाच; प्रशिक्षक डॅनियलला सश्रम कारावास

विद्यार्थ्याकडून लाच; प्रशिक्षक डॅनियलला सश्रम कारावास

Last Updated: Nov 15 2019 11:25PM
पणजी : प्रतिनिधी

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्याकडून लाच स्वीकारण्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या आयटीआय इन्स्ट्रक्टर के हेन्री डॅनियल याला पणजीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी (दि.15) सुनावली. डॅनियल याला बुधवारी न्यायालयाने या लाच प्रकरणी दोषी ठरवले होते. या लाच प्रकरणात त्याला भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केली होती. तेव्हापासून तो जामिनावर होता. सदर प्रकरण 2016 सालचे आहे.आयटीआय इन्स्ट्रक्टर असलेल्या डॅनियल यांनी विद्यार्थ्याला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याने विद्यार्थ्याला दोन हप्त्यांत ही रक्कम देण्यास सांगितले होते. पहिला हप्ता म्हणून 1.50 लाख रुपये व दुसरा हप्ता 25 हजार रुपये द्यावा, असे ठरले होते. मात्र, या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पथकाने सापळा रचून डॅनियल याला 1.50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली होती.

पणजीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी डॅनियल याला या लाच प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद पूर्ण करण्यात आला, शुक्रवारी त्याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.