Wed, May 27, 2020 05:29होमपेज › Goa › मोन्सेरात यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर

मोन्सेरात यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर

Published On: Apr 24 2019 1:04PM | Last Updated: Apr 24 2019 1:04PM
पणजी : प्रतिनिधी 

प्रदेश काँग्रेसतर्फे पणजी पोटनिवडणुकीसाठी बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश काँग्रेसच्या केंद्रीय निवडणुक समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी बुधवारी जारी केला. मोन्सेरात हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असून ते आजपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. मोन्सेरात यांनी गेल्या आठवड्यात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस मध्ये घरवापसी केली होती.

बाबूश मोन्सेरात यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पणजी पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. विकास तसेच रोजगारावर आपण भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पणजी पोटनिवडणुकीत आपल्याविरोधात कोण उभे राहते, हे महत्वाचे नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात देखील आपण निवडणुकीत उतरलो होतो. त्यामुळे भाजप आपल्या विरोधात कुणाला उभे करते हे महत्वाचे नाही. भाजपचा पराजय करण्यासाठी पोटनिवडणुकीत उतरलो असल्याचे  त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.