Wed, May 27, 2020 17:08होमपेज › Goa › एक्झिट पोलमुळे जनतेची दिशाभूल : काँग्रेस

एक्झिट पोलमुळे जनतेची दिशाभूल : काँग्रेस

Published On: May 21 2019 6:14PM | Last Updated: May 21 2019 6:32PM
पणजी : प्रतिनिधी

निवडणूक एक्झिट पोल म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा एक्झिट पोलवर बंदी घालण्याबाबत विचार करावा अशी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

लोकसभा निवडणूक मतदानाचा अंतीम टप्पा नुकताच पार पडला. या टप्प्यानंतर एक्झिट पोल  देण्यात आला असून यात  भाजप आघाडीला ३०० हून अधिक जागा प्राप्‍त होतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा कॉग्रेसच जिंकणार हे स्पष्ट असूनही एक्झिट पोलमध्ये मात्र कॉग्रेसला शुन्य जागा दाखवण्यात आल्या आहेत. यावरुन हे एक्झिट पोल सत्ताधारी मॅनेज करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत बाबू कवळेकर त्यांनी केला आहे. 

यानंतर बाबू कवळेकर यांनी एक्झिट पोलमध्ये एक सांगितले जाते. तर  प्रत्यक्ष निकाल हा भलताच असतो असे सांगितले आहे.