Mon, May 25, 2020 13:56होमपेज › Goa › पर्रिकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाचा धक्का; काँग्रेसची बाजी

पर्रिकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का (व्हिडिओ)

Published On: May 23 2019 1:52PM | Last Updated: May 23 2019 3:46PM
पणजी : पुढारी ऑनलाईन

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा तब्बल २५ वर्ष बालेकिल्ला बनून राहिलेला पणजी मतदारसंघ आज ढासळला. ही जागा भाजपने गमावली आहे. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतांनसिओ (बाबूश) मोन्सेरात यांनी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांचा पराभव केला आहे. काँग्रेससाठी हा विजय महत्वाचा असला तरी पणजी मतदारसंघ गमावल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. 

मोन्सेरात यांना ८,७४८ मते मिळाली आहे. तर कुंकळ्ळीकर यांना ६,९९० मते मिळाली. दरम्यान, गोव्यात अन्य तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. मांद्रे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे, म्हापशातून जोशुआ डिसोझा आणि शिरोड्यातून सुभाष शिरोडकर विजयी झाले आहेत.  

पणजी  पोटनिवडणूक ही  भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती. मांद्रे, म्हापसा व शिरोडा या तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही गोमंतकीयांचे लक्ष लागले होते. पोटनिवडणुकांच्या निकालाशी राज्य सरकारच्या स्थैर्याचा मुद्दा जोडला गेल्याने या निकालाबाबत राज्यात मोठी उत्सुकता होती. अखेर एक जागा गमावून भाजपने तीन जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे गड आणि पण सिंह गेला अशी परिस्थिती भाजपची झाली आहे.