Mon, May 25, 2020 04:50होमपेज › Goa › भाजपचे नेते महादेव नाईक काँग्रेसमध्‍ये करणार प्रवेश 

भाजप नेते महादेव नाईक काँग्रेसमध्‍ये करणार प्रवेश 

Published On: Feb 22 2019 4:49PM | Last Updated: Feb 22 2019 4:49PM
पणजी : प्रतिनिधी 

माजी मंत्री आणि भाजपचे नेते महादेव नाईक हे रविवारी (ता. २४) काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. काही काँग्रेस नेते आपल्याला आज भेटायला आले आणि त्यांनी आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये सामील होत आसल्‍याचे महादेव नाईक यांनी स्‍पष्‍ट केले आहे. 

यासंदर्भात महादेव नाईक यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले की, रविवारी (ता.२४) संध्याकाळी चार वाजता रितसरपणे काँग्रेस पक्षात सामील होणार  आहे. शिरोडा मतदारसंघात होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकीत तिकीट मिळणार आहे का, या प्रश्नावर त्यांनी काही स्पष्ट केले नाही. मात्र त्यांनी हा तिकिटांचा अधिकार काँग्रेस पक्षाचा असून ते योग्यवेळी निर्णय घेतील. 

 शिरोडा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे नाराज झालेल्या भाजपचे माजी आमदार महादेव नाईक यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध आपण निवडणूक लढणार असल्याचे त्याआधी जाहीर केले होते. त्यानुसार आता भाजपच्या सुभाष शिरोडकर या उमेदवारांविरुद्ध काँग्रेसचे महादेव नाईक यांची सरळ लढत होण्याची शक्यता आहे. अजून पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.