Wed, May 27, 2020 18:02होमपेज › Goa › गोवा : भाजपचे नरेंद्र सावईकर यांच्‍याकडून उमेदवारी दाखल

गोवा : भाजपचे नरेंद्र सावईकर यांच्‍याकडून उमेदवारी दाखल

Published On: Mar 28 2019 5:12PM | Last Updated: Mar 28 2019 5:12PM
मडगाव : प्रतिनिधी

भाजपचे लोकसभेचे दक्षिण गोवा उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी गुरुवारी (ता.२८) आपली उमेदवारी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी अजित रॉय यांच्याकडे सुपूर्द केली. आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी दक्षिण गोव्यातील मतदार नरेंद्र सावईकर यांना पुन्हा निवडूण देणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

गुरुवारी सकाळी सावईकर यांनी इतर नेते तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लिंगावर दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. लिंग येथून जिल्हाधिकारी संकुलापर्यंत सावईकर यांनी आपल्या कार्यर्त्यांची रॅली काढली होती. या रॅलीत दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

यावेळी आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, बाबू आजगावकर, विजमंत्री निलेश काब्राल, नुकतेच भाजपात दाखल झालेले दीपक पावसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मंत्री मिलिंद नाईक, आमदार एलिना सलढाणा, सदानंद तानावडे, माजी आमदार सुभाष फळदेसाई, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड व दक्षिण गोव्यातील इतर कार्यकर्ते तसेच नगरसेवक उपस्थित होते.