Mon, May 25, 2020 13:36होमपेज › Goa › पक्षाने चुका मान्य केल्या म्हणून पुन्हा भाजपमध्ये : रमेश तवडकर 

पक्षाने चुका मान्य केल्या म्हणून पुन्हा भाजपमध्ये : रमेश तवडकर 

Published On: Feb 25 2019 8:18PM | Last Updated: Feb 26 2019 1:16AM
मडगाव : प्रतिनिधी

मडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप युवा मोर्चाच्या जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री रमेश तवडकर यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला आहे.  रमेश तवडकर  यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याचा कारणावरून भाजपला सोडचिट्टी  दिली होती. तसेच त्यांनी काणकोण मधून अपक्ष निवडणूक लढवली होती

रमेश तवडकर हे सोमवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. त्याप्रमाणे आज खासदार मिनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत तवडकर यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. ‘२०१७ च्या निवडणुकी वेळी केलेल्या चुका पक्षाने मान्य केल्या आहेत. त्या चुकांची मोठी किमंत पक्षाला भोगावी लागली असून ती हानी भरून काढण्यासाठी आपण पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे.’ असे तवडकर म्हणाले.

भाजपच्या दिल्ली येथील खासदर मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत मडगाव येथील सभागृहात युवा कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमात दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, खासदर विनय तेंडुलकर, सदानंद शेट तानावडे, केतन कुरतरकर, शर्माद रायतुकर माजी आमदार दामू नाईक व इतर उपस्थित होते.