Thu, May 28, 2020 05:57होमपेज › Goa › सांकवाळ, थिवीत 1.73 कोटींचे मद्य जप्त

सांकवाळ, थिवीत 1.73 कोटींचे मद्य जप्त

Last Updated: Jan 25 2020 12:01AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

वजन व माप खात्याने सांकवाळ ओद्यौगिक वसाहत व थिवी ओद्यौगिक वसाहतीत शुक्रवारी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 1.73 कोटी रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्‍त करण्यात आल्या.
वजन व माप खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुवारीनगर येथील सांकवाळ औद्योगिक वसाहतीतील बॉटलिंग युनिटवर मारण्यात आलेल्या छाप्यात 21.5 लाख रुपयांच्या 750 मि.ली.च्या 4 हजार 200 रमच्या बाटल्या जप्‍त करण्यात आल्या.

या बाटल्यांमध्ये भरण्यात आलेली रम ही 20 मि.ली. कमी असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. मुरगाव येथील मेटा स्ट्रीप कॉम्प्लेक्स येथे कारवाई करुन ट्रकांसाठी लागणार्‍या साहित्यावर उत्पादनाची तारीख, महिना व वर्षाचा उल्‍लेख नसल्याने सुमारे 22 हजार रुपयांचे साहित्य जप्‍त करण्यात आले. थिवी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका मद्य बॉटलिंग कारखान्यावर मारण्यात आलेल्या छाप्यात ब्रँडीच्या सुमारे 42 हजार बाटल्या जप्‍त करण्यात आल्या.

जप्‍त केलेल्या सर्व बाटल्यांची किंमत 1.51 कोटी रुपये असून या बाटल्यामंध्ये 4.5 मि.ली. ब्रँडी कमी भरल्याचे आढळले. वजन व माप खात्याने सर्व तिन्ही प्रकरणांमध्ये वजन व माप कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.  वजन व माप खात्याचे सहाय्क नियंत्रक अरुण पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पुरुशन, प्रसाद शिरोडकर, गुलाम गुलबर्ग, देमू मापारी व अन्य जणांनी ही कारवाई केली.