Fri, May 29, 2020 23:14होमपेज › Goa › शिष्टमंडळाला भेटण्यास पक्षाध्यक्ष शहा यांचा नकार

शिष्टमंडळाला भेटण्यास पक्षाध्यक्ष शहा यांचा नकार

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 12:58AMपणजी ः प्रतिनिधी

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गुरुवारी दिल्लीला  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी जाणार्‍या शिष्टमंडळाला बैठकीची वेळ न  मिळाल्याने दिल्ली दौरा रद्द करावा लागला.  

भाजपच्या गाभा समितीचे सदस्य  माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर आणि माजी आमदार दामू नाईक   यांना दिल्ली भेटीची कोणतीही कल्पना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे शिष्टमंडळाकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे शहा यांच्याकडे या गाभा समिती सदस्यांनी तक्रार केल्याने गुरूवारची बैठक घेण्यास शहा यांच्या कार्यालयातून नकार देण्यात आला आहे. यामुळे ही सर्व नेतेमंडळी   एकत्रितरीत्या शहा यांना भेटण्यासाठी स्वतंत्र वेळ मागून घेणार आहेत, अशी माहिती गोवा प्रदेश भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.