Wed, May 27, 2020 18:18होमपेज › Goa › म्हापसा, शिरोडा पोटनिवडणुकीसाठी 'आप'चे उमेदवार जाहीर 

गोवा पोटनिवडणूक; 'आप'चे उमेदवार जाहीर 

Published On: Mar 27 2019 5:51PM | Last Updated: Mar 27 2019 5:52PM
पणजी : प्रतिनिधी 

आम आदमी पक्षाकडून (आप)  म्हापसा व शिरोडा येथे होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. म्हापसातून शेखर नाईक  व शिरोडयातून योगेश खांडेपारकर यांना  उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आपचे नेते तथा लोकसभेचे दक्षिण गोवा उमेदवार  एल्वीस गोम्स यांनी दिली.

राज्यात सूरु असलेल्या राजकीय घडमोडींवरुन भाजपचा स्वार्थ दिसून येत आहे. सदर प्रकार हा  गोमंतकीयांच्या हिताआड असल्याची टीकाही एल्वीस यांनी केली.

एल्वीस गोम्स पुढे म्हणाले, म्हापशातून शेखर नाईक  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाईक हे समाजसेवक असून ते वेळावेळी नागरिकांना सतावणार्‍या विविध समस्यांविरोधात आवाज उठवतात. शिरोडयातून योगेश खांडेपारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खांडेपारकर हे व्यावसायाने शिक्षक असून त्यांनी आप पक्षात दोन वर्षापूर्वी प्रवेश केला होता.