Thu, Jul 02, 2020 14:55होमपेज › Goa › गोव्यात लढाऊ विमान कोसळले; वैमानिक सुरक्षित (video)

गोव्यात लढाऊ विमान कोसळले; वैमानिक सुरक्षित (video)

Last Updated: Nov 16 2019 2:03PM
पणजी : प्रतिनिधी

नौदलाचे मिग-29 के हे लढाऊ विमान गोव्यातील वेर्णा येथील औद्योगिक वसाहत परिसरात आज सकाळी कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सरावादरम्‍यान ही घटना घडल्‍याची माहिती समोर येत आहे.

आज सकाळी नौदलाच्या मिग-29 के या लढाऊ विमानाचा सराव सुरू होता. या दरम्‍यान अचानक हे विमान वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात कोसळले. विमानातील वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारल्‍याने दोन्ही वैमानिकांचे प्राण वाचले आहेत.