Tue, May 26, 2020 08:32होमपेज › Goa › गोवा : आशवे पेडण्यात २ लाखांचा चरस जप्त

गोवा : आशवे पेडण्यात २ लाखांचा चरस जप्त

Published On: Aug 30 2019 7:21PM | Last Updated: Aug 31 2019 1:29AM

संग्रहित छायाचित्रपणजी : प्रतिनिधी

आशवे पेडणे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने २ लाख रूपये किंमतीचा ३८५ ग्रॅमचा चरस जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुमार (वय-३१, हिमाचल प्रदेश) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आज (दि.३०) अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाने प्रदीप कुमार राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत छापा टाकला. यावेळी प्रदीपकडे चरस असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप यास रंगेहाथ पकडले. प्रदीप विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.