Fri, Sep 20, 2019 21:26होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर 17 लाखांचे सोने जप्त; दोघे ताब्यात

‘दाबोळी’वर 17 लाखांचे सोने जप्त; दोघे ताब्यात

Published On: Jan 05 2019 2:14AM | Last Updated: Jan 05 2019 12:39AM
दाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत  एअर इंडिया (एआय 994) विमानातून आलेल्या प्रवाशाकडून 17 लाख रुपयांची 580 ग्रॅम वजनाची 5 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी या प्रवाशासोबत  बंगळूर येथील एका प्रवाशालाही ताब्यात घेण्यात आले.

गोवा कस्टम आयुक्त आर. मनोहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया (एआय 994) या विमानातून आलेल्या प्रवाशाकडून 580 ग्रॅम वजनाची 5 सोन्याची बिस्किटे हस्तगत केली. त्याने सोन्याची बिस्किटे शो पीसमध्ये लपवून आणली होती. या आंतरराष्ट्रीय प्रवाशाबरोबर बंगळूर येथील एका प्रवाशालाही ताब्यात घेण्यात आले. हे सोने तो विमानतळावर स्वीकारणार होता. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 17 लाख रुपये एवढी होते. यंदाच्या  वर्षातील दाबोळी विमानतळावर ही दुसरी कारवाई असून दोन दिवसांपूर्वी एका प्रवाशाकडून 19 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले होते. ही कारवाई अतिरिक्त कस्टम आयुक्त श्रीमती टी. आर. गजलक्ष्मी यांच्या देखरेखीखाली तसेच कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी. यांनी केली.