Wed, May 27, 2020 11:51होमपेज › Goa › गोवा : राज्यात अत्याधुनिक ‘स्मार्ट कियोस्क’ बसवणार : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

गोवा : राज्यात अत्याधुनिक ‘स्मार्ट कियोस्क’ बसवणार : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

Last Updated: Apr 21 2020 6:58PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यामुळे राज्यात कोविड-१९ ची प्रकरणे शून्यावर आली आहेत. त्यामुळे राज्यातील उद्योग क्षेत्राला सवलत देण्यात आली असली तरी औद्योगिक क्षेत्रात तपासणी आणि विमानतळांवर चाचणी सुविधा वाढविणे महत्वाचे आहे. त्यासाठी सरकार राज्यात कोविड-१९ ची चाचणी घेण्यासाठी अत्याधुनिक ‘स्मार्ट कियोस्क’ (बुथ) बसविणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. 

अधिक वाचा : मडगाव पालिका खुली होताच लोकांची झुंबड

मंत्री राणे म्हणाले की, राज्य सरकार सीएसआर अंतर्गत जीई (जनरल इलेक्ट्रिक) च्या सहकार्याने हे अत्याधुनिक ‘स्मार्ट कियोस्क’ बसविणार आहे. याव्दारे कोविड -१९ ची सहजरीत्या चाचणी घेता येईल. या पध्दतीमुळे जलद नमुना संकलन करण्यासाठी मदत होईल तसेच राज्यात अधिकाधिक लोकांच्या चाचणी घेणे वाढेल, असेही राणे यांनी सांगितले. 

अधिक वाचा : औद्योगिक वसाहतीतील 70 टक्के उद्योग सुरू

शहरी आरोग्य केंद्र, रेडक्रॉस पणजी, वेर्णा औद्योगिक वसाहत, कुंडई औद्योगिक वसाहत, म्हापसा औद्योगिक वसाहत, कुंकळी औद्योगिक वसाहत, दाबोळी विमानतळ, एमपीटी आणि केरी चेक पोस्ट, पोळे चेक पोस्ट, मोले चेक पोस्ट, दोडामार्ग चेक पोस्ट आणि पत्रादेवी तपास नाक्याच्या सीमारेषेवरील विविध ठिकाणी हा कियोस्क ठेवला जाईल.

अधिक वाचा : पणजीत वाहतूक कोंडी

राज्यात कोरोनाची सात पॉझिटिव्ह रुग्ण नोंद झाले होते. या सर्व रुग्णांची तब्येत ठीक झाली आहे. त्यामुळे गोवा कोरोनामुक्त झाला आहे. असे असले तरी सरकारने सर्व खबरदारी घेतली असून राज्यात लॉकडाऊन कायम आहे. तसेच लोकांनी सामाजिक अंतर राखावे, असा सल्लाही मंत्री राणे यांनी  दिला आहे.

अधिक वाचा : मुरगावातील सरकारी कार्यालये खुली