Fri, May 29, 2020 22:12होमपेज › Goa › संजय राऊत गोवा दौऱ्यावर जाणार

संजय राऊत गोवा दौऱ्यावर जाणार

Last Updated: Nov 30 2019 7:04PM
पणजी : प्रतिनिधी 

गोवा भाजपचे काही असंतुष्ट आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तसेच गोवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत हे लवकरच गोव्यात येणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी आज (ता.३०) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी कामत म्हणाले की, गोवा भाजपमधील काही आमदार असंतुष्ट बनले असल्याने राज्यात राजकीय स्थित्यंतरे बदलण्याची शक्यता आहे. तसेच गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी खासदार राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान राऊत यांनी गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होईल असे विधान केले होते. 

मात्र त्यांच्या या विधानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. यावरुन गोवा भाजपमध्ये सर्वकाही ठिक असल्याचे त्यांनी सांगितले होते.