Sun, Feb 24, 2019 02:20होमपेज › Edudisha › बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी...

बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी...

Published On: Feb 13 2018 2:08AM | Last Updated: Feb 13 2018 2:08AMलाईट बिल भरण्यापासून ते प्रवासाचे आरक्षण करण्यापर्यंत प्ले स्टोअरवर विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. घरबसल्या बहुतांशी कामे अगदी सहजपणे हाताळू शकतो. आता आपले करिअर निश्‍चित करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी देखील अ‍ॅप साह्यभूत ठरत आहेत. आज असंख्य अ‍ॅप उपलब्ध असून ते बायोडेटा निर्दोष आणि सर्वोत्तम करण्यासाठी उपयुक्‍त ठरू शकतात. करिअर चांगला बिल्टअप करायचा असेल तर रिझ्युम चांगला हवा. केवळ चांगले गुण असून चालत नाही तर ते कंपनीसमोर योग्य तर्‍हेने मांडता आले पाहिजे. कंपनीला गृहीत धरून रिझ्युम किंवा बायोडेटा तयार करू नका. आपल्या बायोडेटाच्या माध्यमातूनच कंपनीला आपली ओळख होत असते. अपडेट आणि सुटसुटीत बायोडेटा असेल तर कंपनीला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची जुजबी कल्पना येते. पूर्वी हार्डकॉपीवर बायोडेटा असायचा.

आता सॉफ्टकॉपी म्हणजे सीव्हीच्या रूपातून बायोडेटा दिला जातो. त्यासोबत अत्यावश्यक असलेल्या पीडीएफ फाईल देखील जोडल्या जातात. मग विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण्य असो किंवा आर्टिकल्स, प्रबंधाची प्रत असो. संबंधित पदासाठी आपला रिझ्युम कसा उपयुक्‍त ठरेल याचा विचार करायला हवा. विसंगत माहिती भरण्याचे टाळून पूरक माहिती देणे गरजेचे आहे. रिझ्युम अपडेट करणारे अनेक अ‍ॅप उपलब्ध असून त्याच्या मदतीने रिझ्युम आपण सर्वोत्तम तयार करू शकतो. गुगल प्ले स्टोअर आणि  आयओएस आपल्या स्मार्टफोनमधील रिझ्युममध्ये अचुकता आणतात. बायोडेटा अपडेट करण्यासाठी काही अ‍ॅप येथे आपल्याला सांगता येतील.

•माय रिझ्युम किंवा सीव्ही बिल्डर :

माय रिझ्युमे किंवा सीव्ही बिल्डर नावाचा अ‍ॅप बायोडेटा करण्यासाठी अत्यंत सोपा आणि सुटसुटीत आहे. यात प्राथमिक माहिती भरल्यास रिझ्युमे तयार होतो. त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारात रिझ्युमे हवा आहे, याचीही विचारणा करतो. आपण जसजसी माहिती भरत जाऊ तसतशी पीडीएफ फाईल तयार होत जाते. त्यात काही चूक राहिल्यास संपादन करून फाईल सेव्ह करू शकतो आणि गरज असल्यास प्रिंट काढता येते किंवा मेल करता येतो. 

•मेक माय रिझ्युम :

मेक माय रिझ्युमेच्या माध्यमातून माहिती भरताना टेम्प्लेटची सुविधा दिली आहे. त्यामुळे रिझ्युमे अधिक आकर्षक होऊ शकते. अन्य फिचर सामान्य अ‍ॅपप्रमाणेच उपयुक्‍त आहेत. कमीत कमी शब्दात चांगला रिझ्युमे तयार करण्यासाठी हा अ‍ॅप उपयुक्‍त आहे. 

•माय रिझ्युम :

माय रिझ्युमे अ‍ॅपमध्ये आपण फाँट, कलरचा वापर करू शकतो. तसेच शब्दाचा आकारही कमी जास्त करू शकतो. आपल्याला कोणत्या रंगात, फॉटमध्ये शब्दरचना हवी आहे, त्यानुसार निवड करता येते. ठळक मुद्द्यांना अधोरेखित करण्याची सोय करून दिली आहे. तसेच सही, जागा, तारीख याचा गरजेनुसार वापर करता  येतो.  रिझ्युमे भरताना टेम्प्लेटचा फॉरमॅट वापरू शकतो. 
•

रिझ्युम अ‍ॅप :

हा अ‍ॅप अन्य अ‍ॅपपेक्षा वेगळा आहे. फेसबुकच्या लॉगइनने हा अ‍ॅप सुरू करता येतो. कंपनीला आवश्यक असणारी माहिती भरणे, कामातील आपले प्लस पॉईंट, छंद, आवड, अतिरिति शैक्षणिक पात्रता आदींची माहिती भरता येते.

मानसी जोशी