Thu, Dec 13, 2018 02:09होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Published On: Feb 12 2018 10:48PM | Last Updated: Feb 12 2018 10:48PMकेंद्रीय लोकसेवा आयोगमार्फत (यू.पी.एस.सी.) 782 - आय.ए.एस., आय.पी.एस. इ. नागरी सेवा व इंडियन फॉरेस्ट सेवा इ. पदांकरिता प्राप्‍त उमेदवारांकडून 6 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून पूर्व परीक्षा 3 जून 2018 रोजी होणार आहे. अधिक माहिती upsc.gov.in येथे उपलब्ध.

आयडीबीआय बँक - 760 एक्झिक्युटिव्ह पदांकरिता पदवी 60 टक्के (मागासवर्गीयांना सवलत) उमेदवारांकडून 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. परीक्षा 28 एप्रिल 2018 रोजी होणार असून कोल्हापूरसह महाराष्ट्रात 14 परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत. अधिक माहिती idbi.com येथे उपलब्ध.

रेल्वे मध्य 62907 ग्रुप डी - हेल्पर, ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटल अटेंडंट, असिस्टंट पॉईंटमन, गेटमन, पोर्टर, हमाल, स्वीपर इ. पदांकरिता 10 वी, आयटीआय (एनसीव्हीटी/एससीव्हीटी) पात्रताधारक उमेदवारांकडून 12 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात rrbmumbai.gov.in येथे उपलब्ध.

महाराष्ट्र शासन - 908 कृषिसेवक पदांसाठी ठाणे - 210, पुणे - 99, नाशिक - 108, नागपूर - 218, लातूर - 50, कोल्हापूर - 96, औरंगाबाद - 92, अमरावती - 41 डिप्लोमाधारक उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात krishi.maharashtra.gov.in
येथे उपलब्ध.

109 - बटालियन - कोल्हापूर - 70 शिपाई, कूक व इतर भरती कालावधी 12 ते 17 मार्च 2018 पर्यंत.

भारतीय तटरक्षक दल - नाविक - कूक व स्टेवर्ड पदांकरिता 10 ते 16 फेब्रुवारी 2018 ऑनलाईन अर्ज पर्यंत मागविणेत येत आहेत.  अधिक माहिती joinindiannavy.gov.in येथे उपलब्ध.

सैन्य भरती पोलिस- परेड ग्राऊंड उस्मानाबाद येथे 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2018 या कालावधीत होणार असून रजि. 20 मार्च 2018 पर्यंत असेल तसेच पुणे, बीड, लातूर, नगर व उस्मानाबाद इ. सहभागी जिल्हे असतील. अधिक माहिती joinindiannavy.gov.in येथे उपलब्ध.

गडचिरोली बँक - ज्युनि. ऑफिसर व क्‍लार्क पदांकरिता पदवी व संगणक पात्रता असून 17 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात gdccbank.com येथे उपलब्ध.    

संकलन : ज्ञानदेव भोपळे