Wed, Oct 24, 2018 02:50होमपेज › Edudisha › करिअर ग्राफिक डिझायनिंगमधील 

करिअर ग्राफिक डिझायनिंगमधील 

Published On: Dec 04 2017 8:16PM | Last Updated: Dec 04 2017 8:15PM

बुकमार्क करा

ग्राफिक डिझायनिंग हे टाईपोग्राफी, फोटोग्राफी आणि इलस्ट्रेशनचा वापर करून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशन डिझाईन यांना एकत्रित करून केली जाणारी प्रक्रिया आहे. एखादा विचार, संदेश हा सॉफ्टवेअरच्या मदतीने किंवा हाताने खुणा, चित्र आणि शब्द यांच्या मार्फत पोहोचवण्याचे काम ग्राफिक डिझायनर  करत असतो. 

सर्वसाधारणपणे ग्राफिक्स डिझाईन्सचा वापर हा कॉर्पोरेट डिझाईन (लोगो आणि ब्रँडिंग) साठी केला जातो. तसेच वृत्तपत्रात, पुस्तकात संपादकीयाचे आरेखन करण्यासाठी, पर्यावरणविषयक आरेखन, जाहिराती, ब्रोशर्स, कार्पोरेट अहवाल, वेब डिझाईन्स, कम्युनिकेशन डिझाईन्स, उत्पादनांचे पॅकिंग, साईनेज यासाठी देखील ग्राफिक डिझाईन्सचा वापर केला जातो. उत्पादनांचे विपणन आणि विक्री यांच्यामध्ये  ग्राफिक डिझाईनचा वाटा मोठा असतो. 

•  सॉफ्टवेअरचे ज्ञान- ग्राफिक डिझायनिंग करताना नव्या नव्या सॉफ्टवेअर्सची माहिती आणि कॉम्प्युटरशी निगडित नवनवी माहिती असणे गरजेचे आहे  जेणेकरून स्पर्धा करता येते. अडोब क्रिएटिव्ह सूटचा वापर डिझायनर्स सर्वाधिक वेळा करतात. फोटोशॉप, इनडिझाईन आणि इलस्ट्रेटर या तीन गोष्टींची माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण डिझायनिंगमध्ये इलस्ट्रेटरचा वापर लोगो डिझायनिंगसाठी आणि वेक्टर ग्राफिक्ससाठी आणि फोटोशॉपचा वापर इमेज एडिटिंग आणि वेब डिझायनिंगसाठी तर इनडिझाईनचा वापर प्रिटसाठी केला जातो. 

• शैक्षणिक पात्रता- या क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी ग्राफिक डिझाईन किंवा त्या संबंधी क्षेत्रात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. मात्र, कोणताही पदवीधर व्यक्‍ती ग्राफिक डिझाईन्सचे तांत्रिक ज्ञान प्रशिक्षण मिळवून यात करिअर करू शकते. ग्राफिक डिझायनिंग हे कला आणि तंत्रज्ञान याचे एकत्रित रूप आहे. कला क्षेत्रातील पदविका मिळवलेल्या काही विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांचा ग्राफिक डिझायनिंगचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून चांगले पैसे आणि प्रसिद्धी मिळवत आहेत. बारावी पास झाल्यानंतरही हा अभ्यासक्रम करता येतो. उद्योग व्यवसायांच्या वर्तमान गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांच्या माध्यामातून ग्राफिक डिझायनिंग शिकवले जाते. 

अशा प्रकारे व्यावसायिक स्तरावरील प्रशिक्षण देणार्‍या संस्थाच. योग्य प्रकारे शिकवू शकतात.  त्यात अडोब फोटोशॉप, अडोब इनडिझाईन, इलस्टेटर आणि कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरच्या वापराचे प्रशिक्षण दिले पाहिजे. या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून वियार्थ्यांना ब्रांड आयडेंटिटी, पोस्टर, फ्लायर, ब्रोशर, न्यूजलेटर, मॅगजिन, लेआऊट, अ‍ॅडव्हटोरियल, प्रेस अ‍ॅड, वेब बॅनर, वेब पेज, इमेज एडिटर इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. 

विजयालक्ष्मी साळवी