Fri, Apr 26, 2019 19:08होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Published On: Dec 25 2018 1:34AM | Last Updated: Dec 24 2018 8:02PM
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - 342 राजपत्रित अधिकारी वर्ग 1 व 2 यामध्ये तहसीलदार, पोलिस आयुक्‍त, वित्त व लेखा, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, नायब तहसीलदार इ. पदाकरिता पूर्व परीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी होणार असून 31 डिसेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mpsc.gov.in येथे उपलब्ध.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - समन्वयक, वसतिगृह प्रमुख व विविध मॅनेजर पदाकरिता ता. 9 जानेवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात maharecruitment.mahaonline.gov.in उपलब्ध.

संभाव्य - बँकिंग क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणेसाठी मार्च 2019 पर्यंत बँकेत एक लाख पदे भरणेचा केंद्र सरकारचा प्रस्ताव.

रिझर्व्ह बँकेमध्ये विविध ऑफिसर पदाकरिता 8 जानेवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात opportunities.rbi.org.in येथे उपलब्ध.

रेल्वे - 78 डाटा एन्ट्री /एक्झिक्युटिव्ह असिस्टंट /डिजिटल ऑफिस असिस्टंट पदाकरिता 11 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात cr.indianrailways.gov.in येथे उपलब्ध.

नेहरू युवा केंद्र - 228 - को-ऑर्डिनेटर, अकौंटंट क्‍लार्क, मल्टी टास्किंग पदाकरिता 31 डिसेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात nyks.nic.in येथे उपलब्ध.

रेल्वे - 3553 - अप्रेटिन्स पदाकरिता 9 जानेवारी 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात rrc-wr.com येथे उपलब्ध.

ठाणे महानगरपालिका - 24 अटेंडट पदाकरिता थेट मुलाखत 29 डिसेंबर 2018 रोजी होणार असून सविस्तर जाहिरात thanecity.gov.in येथे उपलब्ध.

न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीमध्ये 312 प्रशासकीय अधिकारी पदाकरिता पदवी 60 टक्के उमेदवारांकडून 26 डिसेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात  newindia.co.in येथे उपलब्ध. 

संकलन - ज्ञानदेव भोपळे