Wed, Apr 01, 2020 12:40होमपेज › Edudisha › अर्थशास्त्रात करिअर करायचंय?

अर्थशास्त्रात करिअर करायचंय?

Last Updated: Mar 16 2020 7:52PM
उदारीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थाही वेगाने विकसित झाली. त्याचा परिणाम इतर विविध क्षेत्रांतही जाणवला. हा विकासाचा स्तर असाच कायम राहावा, यासाठी आज अनेक क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्रातील जाणकारांना (अर्थशास्त्रज्ञांना) मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशा वेळी करिअरच्या द‍ृष्टिकोनातून एक पर्याय म्हणून अर्थशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्षेत्र - अनेक उद्योगधंदे, शिक्षण, कृषी, लोकसंख्या, पर्यावरण आदी विविध क्षेत्रांत अर्थशास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कुठलाही विभाग असो, अर्थशास्त्रज्ञ कोणतेही शोधकार्य तडीस नेऊ शकतात. एकत्र डेटाच्या आधारावर त्यांच्याकडून वेगवेगळ्या आर्थिक धोरणांचे निर्धारण केले जाऊ शकते. तसेच, विविध अर्थ कार्यप्रणालीचा अवलंब केला जाऊ शकतो.

विविध अभ्यासक्रम - तसे पाहिले तर बारावीपासूनच खर्‍या अर्थाने अर्थशास्त्राचे शिक्षण सुरू होते; पण यासाठी असलेले अभ्यासक्रम पदव्युत्तर पातळीवरील आहेत. अर्थशास्त्र पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर तुम्ही यात एम.फिल. किंवा पीएच.डी.ही करू शकता. अर्थशास्त्राशी निगडित अनेक क्षेत्रे आहेत, ज्यात तुम्ही यश प्राप्त करू शकता.

या क्षेत्रांत संधी

तुम्ही अर्थशास्त्रात कुशल असाल तर तुम्हाला फायनान्स कंपन्या, बँकिंग सेक्टर, इकॉनॉमिक - फायनाशियल अ‍ॅण्ड  ऑर्गनायझेशन, मार्केटिंग कंपन्या, गुंतवणूक संस्था, कन्सल्टंट फर्म, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट कंपन्या अशा अनेक क्षेत्रांत तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. तसेच, सरकारी व खासगी या दोन्ही संस्थांमध्येही अर्थशास्त्रज्ञांना खूप मागणी आहे. अर्थशास्त्रीय पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातही तुम्ही करिअर करू शकता. याबरोबरच नागरी सेवा, आर्थिक व सांख्यिकी सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्येही तुम्ही बसू शकता.