इकोनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्र हा सदासर्वकाळ उपयुक्त ठरणारा विषय मानला गेला आहे. अर्थशास्त्राला प्रत्येक काळात आणि परिस्थितीत मागणी राहिलेली आहे. इकोनॉमिक्स हा अत्यंत शिस्तबद्ध आणि रोजगाराभिमूख विषय मानला जातो. अर्थशास्त्र विषयात निपूण असलेल्या उमेदवाराला बाजारात मोठी मागणी आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना मागणी वाढलेली दिसून येते. अर्थविश्लेषक, अर्थसंशोधक आणि अर्थसल्लागार अशा मंडळींची जगात आणि देशात नेहमीच मागणी राहिलेली आहे.