Thu, Nov 14, 2019 06:48होमपेज › Edudisha › UPSC/MPSC मुलाखत : एक अनिवार्य टप्पा

UPSC/MPSC मुलाखत : एक अनिवार्य टप्पा

Published On: Jul 09 2019 1:00AM | Last Updated: Jul 09 2019 1:00AM
प्रा. सुजित गोळे

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनतीची आवश्यकता असतेच. मात्र, तिला योग्य दिशेची साथ मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. अशाच प्रकारचे चित्र हे स्पर्धा परीक्षेत पाहवयास मिळते. स्पर्धा परीक्षेच्या सर्वच टप्प्यांत उमेदवाराचा कस लागतो. यामधील शेवटचा टप्पा (last but not least) मुलाखत ज्याला व्यक्‍तिमत्त्व चाचणी असेही म्हणतात. यासंबंधी आपण चर्चा करूया.

मुलाखत हा शब्दप्रयोग केल्यावरच बर्‍याच जणांना धडकी बसते व काहीतरी अवघड/मोठे आपणास पार करायला लागणार आहे, असे वाटण्यास सुरुवात होते. मात्र, आपण डोळसपणे याकडे पाहिल्यास एक गोष्ट जाणवते ती म्हणजे यामध्ये उमेदवारांची originality तपासली जाते. ज्याच्यामार्फत उमेदवाराचा मानसिक, भावनिक, सामाजिक व राजकीय कल पडताळला जातो. अशा रितीने बाहेरील जगाकडे पाहण्याचा द‍ृष्टीकोन तर पडताळला जातोच. मात्र, स्वतःच्या बाबतीत किती सजग आहोत हे देखील महत्त्वाचे ठरते.
काही महत्त्वाचे ठोकळ मुद्दे पुढीलप्रमाणे बाहेर पडतात.

1) Bio data - Bio data हा उमेदवाराचा आरसा असतो. ते एक प्रकारचे मुलाखतीचे शस्त्रच असते. मात्र, शस्त्राचा योग्य वापर न झाल्यास आपल्यालाच धोका होऊ शकतो. म्हणूनच तो योग्य असावा, यावरच मुलाखतीच्या प्रश्‍नांचे स्वरूप अवलंबून असते. यामध्ये उमेदवाराची स्वत:ची माहिती, छंद, शैक्षणिक प्रवास, सामाजिक कार्य इ. चा समावेश होतो. तयारीसाठी स्वतःशी निगडित माहिती योग्य पद्धतीने संग्रहीत करावी व त्यावर प्रश्‍न तयार करावेत. यासाठी वर्तमानपत्र, पुस्तके, Internet यांचा वापर करावा.

2) तपासले जाणारे गुण -कोणत्याही मुलाखतीमध्ये काही महत्त्वाचे व सामाईक गुण उमेदवाराकडे असणे अनिवार्य ठरते - आत्मविश्‍वास, समस्या निवारण, नम्रता, प्रामाणिकपणा, निर्णयक्षमता, आशावाद, संवाद कौशल्य इ.

3) देहबोली - अधिकारी हा फक्‍त अभ्यासू कीडा असू नये तर त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाला इतर पैलूदेखील असावेत. देहबोली अंतर्गत आपण नजर, केस, चेहर्‍यावरील हावभाव, हातवारे, बोलण्याचा सूर इ. घटकांमार्फत नकारात्मक किंवा होकारात्मक प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे या घटकावरदेखील लक्ष देणे सोयीचे ठरते.

4) पोषाख - "First Impression is the Last Impression" ज्यावेळी उमेदवार मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करतो. त्यावेळी सर्वप्रथम लक्ष केंद्रीत होते ते त्याच्या पोषाखावर. पोषाख हा साधा मात्र स्वच्छ व नियमितपणाचा असावा. यामुळे उमेदवार संपूर्ण लक्ष मुलाखतीवर केंद्रीत करू शकतो.

5) Mock Interview/ रंगीत तालीम - : जरी तयारी योग्य पद्धतीने केली असली तरी जर त्याची रंगीत तालीम न झाल्यास ऐनवेळी गोंधळ उडू शकतो. यासाठी आरशासमोर अथवा वरिष्ठांच्या सहाय्याने रंगीत तालीम करावी. अशा प्रकारे मुलाखतींसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्यास योग्य गुण प्राप्‍त होतात.