होमपेज › Edudisha › तांत्रिक नोकर्‍यांना सुगीचे दिवस

तांत्रिक नोकर्‍यांना सुगीचे दिवस

Published On: Jun 05 2018 1:20AM | Last Updated: Jun 04 2018 7:55PMअपर्णा देवकर

सध्याच्या तांत्रिक जगात यापूर्वी कधीही पाहण्यात न आलेले बदल घडताना दिसताहेत. जुन्या ड्रॉईंग बोर्डावर कल्पना साकारण्याच्या युगातून बाहेर पडून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किंवा ती कार्यन्वयन जगातील संघटना करताहेत.  नव्या तांत्रिक सेवा किंवा उत्पादने लोकांसमोर आणण्यासाठी सध्या जास्तीत जास्त संस्था डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. 

जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तांत्रिक नोकर्‍यांच्या परिस्थितीवर नक्‍कीच परिणाम होणार आहे. सर्जनशील निर्मितीसाठी वैयक्‍तिक कॉम्प्युटर तयार करणे असो किंवा वापरण्यास सोपे डिव्हाईस या कोणत्याही गोष्टीसाठी तांत्रिक अभियंत्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या नोकर्‍या आहेत. त्यामध्ये आता बदल होत आहेत. प्रगत तंत्रज्ञानातील नोकर्‍या आता कृत्रिम बुद्धिमत्ता, अ‍ॅग्युमेंटेड अँड व्हर्च्युअल रिआलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात निर्माण होताना दिसताहेत. त्यातही क्लाऊड कॉम्प्युटिंग, नेटवर्क टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी या नव्या नोकर्‍या निर्माण होत आहेत. भविष्यात आस्थापनांची त्यांचा व्यवसाय आणि प्रक्रिया यांच्यात बदल केल्यास नोकरीसाठी काही नव्या संधी किंवा भूमिका निर्माण होतील असे निरीक्षणातून वाटते. 

•सायबरसिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट-

जसा इंटरनेटचा वापर वाढू लागला आहे त्याच प्रमाणात त्याचे धोकेही वाढताहेत. वैयक्‍तिक सुरक्षा सध्या दावणीला बांधल्याची अवस्था आहे त्यामुळेच सायबर तज्ज्ञांना विशेष महत्त्व आले आहे. हा तज्ज्ञ व्यक्‍ती संस्थेला असणारी असुरक्षितता, धोके ओळखण्याच्या उद्दिष्टाने एड पॉईंट आणि नेटवर्क होस्ट डेटा एकत्र करण्यासाठी आणि ती परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित तांत्रिक साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करेल. 
नेटवर्क इंजिनिअर : व्यावसायिक संवाद कार्यक्षम पद्धतीने व्हावा यासाठी क्लाऊड आणि पारंपरिक नेटवर्किंग स्रोत यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका या व्यक्‍तीला पार पाडायची असते. व्यवसायाच्या गरजेनुसार तांत्रिक घटक किंवा टेक्निकल नेटवर्क एलिमेंट (राऊटर, अ‍ॅन एज डिव्हाईस, मायक्रो डेटा सेंटर)कसे वापरायचे याची माहिती त्यांना घ्यावी लागते. 

व्हल्नराबिलिटी असेसमेंट मॅनेजर : पेनट्रेशन टेस्टरची भूमिका जास्त बदलली आहे. सर्व्हर हॅक करणे किवा नवे सुरक्षा माध्यमे वापरण्यापलीकडचे काम या व्यवस्थापकाला करावे लागते आहे. त्याला जबाबदारी पेलावी लागते आणि योग्य आणि अस्वीकार्ह असलेला धोका ओळखण्यासाठी मजबूत पण व्यापक अशी चाचणी घेतो. 

तांत्रिक सपोर्ट तज्ज्ञ : कॉम्प्युटर दुरुस्ती करण्यासाठी हेल्प डेस्कच्या व्यक्‍तींची मदत घेण्याचे जुने दिवस सरले आहेत. आता जगाला कुशल तांत्रिक सपोर्ट देऊ करणारे तज्ज्ञ हवे आहेत. आजचे तांत्रिक सपोर्ट इंजिनिअर डाटा मॅनेजमेंट, ऑथेंटिकेशन आणि नेटवर्क ट्रबल शूटिंग सारखे गुंतागुंतीच्या गोष्टीही हाताळतो. 

मशिन लर्निंग इंजिनिअर : मशिन लर्निगमध्ये एआय आणि सिस्टिम मशिन तयार करण्यासाठी अगदी सरळसोट असा आर आणि पायथॉन सारखे प्रोग्राम वापरले जातात. दिलेले काम उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी ते शिकून त्याचे कार्यन्वयन केले जाते. 

नेटवर्क अ‍ॅनालिस्ट : उद्योगजगत आजकाल नेटवर्कमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करताना दिसतात कारण आयओटीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून  तांत्रिक उत्पादनांची निर्मिती करणे कठीण झाले आहे. येत्या काही वर्षांत नेटवर्क ट्रॅफिकवर रिअल टाईम ट्रेंडिग माहिती कशी द्यायची आणि त्याचा व्यवसायासाठी कसा उपयोग होतो यासाठी नेटवर्क अनालिस्टला त्यांचे तांत्रिक कौशल्याचे ज्ञान आणि त्याचे कार्यान्वयन कसे करावे याचा मेळ घालतील. 

क्लाऊड इंजिनिअर : क्लाऊड करण्यासाठी बहुतेक सर्व उद्योग आवारातच व्यवस्था तयार करतात आणि अनेक व्हेंडर्स बरोबर एकत्रित काम करतात. येत्या काही वर्षांत विविध तांत्रिक गोष्टी एकत्र करून उपाय किंवा निष्कर्ष काढण्याचे काम क्लाऊड इंजिनिअरला करावे लागेल. 

आता ते दिवस राहिले नाहीत जेव्हा मायक्रोसॉफ्ट इंजिनिअरला अझुरे माहीत असायचे आणि अ‍ॅमॅझोन इंजिनिअरिंगला एडब्ल्युएस वर काम करण्याची माहिती असावी. ग्राहकांच्या वाढत्या गरजांबरोबर आणि बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर अभियंत्यांना नवीन ज्ञान शिकावे लागेल आणि भविष्यासाठीही नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील.