Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Edudisha › फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये करा करिअर

फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये करा करिअर

Published On: Nov 14 2017 2:22AM | Last Updated: Nov 13 2017 8:53PM

बुकमार्क करा

वनिता कापसे

जेव्हा  एखाद्या औषधांची निर्मितीची प्रक्रिया होते, तेव्हा त्या प्रक्रियेशी अनेकजण जोडले जातात. त्यात मेडिकल  केमिस्ट, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट, क्लिनिकल, फार्मासिस्ट, केमिकल इंजिनिअर, बायोमेडिकल इंजिनिअर यांचा संबंध येतो. 

फार्मास्युटिकल्स इंजिनिअरिंग अभियांत्रिकीची भिन्‍न शाखा मानली जाते. औषधशास्त्राच्या प्रत्येक पातळीवर फार्मास्युटिकल्स इंजिनिअरची गरज भासते. या अनुषंगाने करिअरची मोठी संधी युवकांसाठी उपलब्ध झाली आहे. 

फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग (औषधशास्त्र अभियांत्रिकी) ही फार्मास्युटिकल सायन्स आणि टेक्नॉलॉजीची शाखा आहे. या शाखेत औषधशास्त्र उद्योगातील विकास आणि उत्पादन किंवा उत्पादन, प्रक्रिया, घटकांचा समावेश होतो. फार्मास्युटिकल्स कंपनीत औषधी तयार करताना प्रत्येक पातळ्यांवर, संशोधनाच्या पातळीवर फार्मास्युटिकल्स इंजिनिअर हवा असतो. औषधांची निर्मिती, पॅकेजिंग, वितरण व्यवस्था, लेबलिंग, फॅसिलिटी डिझाईन, व्यवस्थापन आणि विक्रीसाठी फार्मास्युटिकल इंजिनिअर मोलाची मदत करतो. 

फार्मास्युटिकल्स इंजिनिअर म्हणून काम करत असताना इंजिनिअर आणि सायन्सच्या विविध क्षेत्रांत जसे की केमिकल इंजिनिअरिंग, बायो प्रोसेस इंजिनिअरिंग, केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीमध्येही सहभाग घेतात.

अभ्यासक्रम : भारतात अनेक नामवंत फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचे अध्यापन करणार्‍या संस्था आहेत. पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी या पातळीवर पदवी अभ्यासक्रम या संस्थेत शिकवले जातात. बी.ई., बी.टेक., बी.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी फार्मास्युटिकल्सचे निकष ठरवलेले आहेत. यानुसार निकषात बसणारा विद्यार्थी फार्मास्युटिकल्स इंजिनिअर हाऊ शकतो.

संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, अण्णा विद्यापीठ, चेन्‍नई, जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी विद्यापीठ, हैदराबाद. वेतनमान : फार्मास्युटिकल्स कंपन्या सुरुवातीला 12 ते 15 हजार रुपये वेतन दरमहा देतात. कालांतराने वेतनमानात सुधारणा होऊन ते वेतन लाखांपर्यंत जाते.