होमपेज › Edudisha › महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा  (PSI / STI / ASO)

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा  (PSI / STI / ASO)

Published On: Jun 11 2019 1:11AM | Last Updated: Jun 18 2019 2:07AM
 प्रा. सुजित गोळे

प्रस्तुत लेख हा मागील लेखाचा उत्तरार्ध आहे. या लेखात आपण उर्वरित टप्प्यांचा आढावा घेणार आहोत.

पूर्व परीक्षेचे स्वरूप व निकाल-

पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चउट) स्वरूपाची असून एकूण 100 गुणांसाठी घेतली जाते. उमेदवाराने 100 प्रश्‍न हे एका तासात सोडविणे अनिवार्य असते. सदर परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी घेतली जाते. मात्र, उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्यास परीक्षा केंद्रातही वाढ केली जाते. 

उमेदवारांनी यासाठी पुढील घटकांचा अभ्यास करावा-

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी व अंगगणित, उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करताना प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, या अनुषंगाने पेपर सोडविताना उत्तराच्या अचुकतेवर भर देणे सोईस्कर ठरते. 
पूर्व परीक्षेच्या निकालासाठी प्रत्येक संवर्गातील (झडख/डढख/अडज) पदसंख्येचा विचार करून त्यानुसार स्वंतत्र गुणांची सीमारेषा (र्उीीं ेषष ङळपश) निश्‍चित करण्यात येते.
जे उमेदवार पूर्व परीक्षेत पास होतात, त्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी ग्राह्य धरले जाते.

दुसरा टप्पा -मुख्य परीक्षा 

मुख्य परीक्षेचा उद्देश हा उमेदवाराचे विषयांत असणारे सखोल ज्ञान तपासणे हे असल्यामुळे उमेदवाराला अभ्यासाची व्याप्ती वाढवावी लागते.

स्वरूप व निकाल-

 1) पेपर क्र.1-100 गुण (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)  या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्‍न  100 गुणांसाठी विचारण्यात येतात त्याचा तपशील पुढील प्रमाणे -मरठी (50), इंग्रजी (30), सामान्य ज्ञान (20).
हा भाषा पेपर तीन्ही पदांसाठी असल्यामुळे सदर पेपर तीन्ही पदांसाठी एकाच दिवशी, एकाच वेळी संंयुक्‍त स्वरूपाचा घेतला जातो. 

2) पेपर क्र 2-100 गुण (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी)
सदर पेपरचा अभ्यासक्रम हा पदांची कर्तव्ये व जबाबदारी यानुसार बदलतो त्यामुळे हा स्वतंत्र प्रकारे वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येणारा पेपर आहे. यामध्ये एकूण 100 गुणांसाठी 100 प्रश्‍न विचारले जातात. 

मुख्य परीक्षा ही औरंगाबाद, नागपूर, मुंबई व पुणे या केंद्रांवर घेण्यात येते या परीक्षेचे गुण मोजताना प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात. तसेच पेपर क्र.1 व 2 अशा दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून निकाल प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येते. अशाप्रकारे डढख  व अडज पदांसाठी या टप्प्याच्या निकालाद्वारे उमेदवार निवडले जातात तर झडख पदासाठी जास्तीचा टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी व मुलाखत याला उमेदवाराला सामोरे जावे लागते, त्या संबंधित सखोल माहिती आपण पुढील लेखात पाहू.