Wed, Nov 13, 2019 12:30होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या

संधी नोकरीच्या

Last Updated: Nov 05 2019 12:51AM
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस - 3650 पोस्ट मास्तर /डाकसेवक पदांच्या भरतीकरिता 10 वी पास व संगणक ज्ञान प्राप्त उमेदवारांकडून 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात appost.in/gdsonline येथे उपलब्ध.

 ऑर्डिनन्स  फॅक्टरी - मध्ये 4805 आय टी आय किंवा नॉन आय टी आय अप्रेटीस पदांकरिता 10  वी किंवा आय टी आय उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत असून ऑनलाईन अर्ज डिसेंबर 2019 च्या लास्ट विक उपलब्ध होतील. अधिक माहिती ofb.gov.in/news येथे उपलब्ध.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 74 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांकरिता 21 डिसेंबर 2019 परीक्षा असून 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात centralbankofindia.co.in येथे उपलब्ध.

मुंबई उच्च न्यायालय - औरंगाबाद खंडपीठमध्ये कनिष्ठ अनुवादक अ‍ॅण्ड इंटरपिटर पदांकरिता 10 नोव्हें. 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात bombayhighcourt.nic.in येथे उपलब्ध.

ऊर्जा कार्यक्षमता सेवा लि. - 235 मॅनेजर, अधिकारी व विविध असिस्टंट पदांकरिता 30 नोव्हेंबर 2019 ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात eeslindia.org येथे उपलब्ध.

भारतीय तटरक्षक दलामध्ये नावीक पदांकरिता -10 वी 50 टक्के उमेदवारांकडून 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात joinindiancoastguard.gov.inयेथे उपलब्ध.

सीमा रस्ते संघटन - 540 मल्टि स्किल्ड वर्कर पदांकरिता 10 वी व संबंधित आय टी आय उमेदवारांकडून 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात bro.gov.in येथे उपलब्ध.

  भारतीय सैन्य 131 वी टेक्निकल पदवीधर कोर्स - जुलै 2020 -ऑनलाईन अर्ज 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत आणि भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 43-ऑनलाईन अर्ज 13 नोव्हेंबर 2019 पर्यंत असून अधिक माहिती joinindianarmy.nic.in येथे उपलब्ध.

सैन्य भरती मुंबई - 13 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार असून रजिस्टेशन 27 नोव्हेंबर 2019 करावयाचे आहे. अधिक माहिती indianarmy.nic.in येथे उपलब्ध.

कॅबिनेट सचिवालयामध्ये - 29 उपक्षेत्र अधिकारी पदांकरिता पदवी प्राप्त उमेदवारांकडून 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात cabsec.gov.in येथे उपलब्ध.

कर्मचारी निवड समितीमार्फत - असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर ऑफ एक्साइज, प्रतिबंधात्मक अधिकारी, इन्स्पेक्टर (एक्झामिनर), सहायक अंमलबजावणी अधिकारी, सब इन्स्पेक्टर.
 
  इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट, विभागीय लेखापाल, सांख्यिकी तपासणी, असिस्टंट ऑडिट ऑफी, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर,ऑडिटर,अकौंटंट,वरिष्ठ सचिवालय सहायक, कर सहायक, कंपायलर इ 19 विभागांत भरतीकरिता पदवी प्राप्त उमेदवारांकडून 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूरसह 15 परीक्षा केंद्र उपलब्ध आहेत. महिला, एसी, एसटी प्रवर्गाला परीक्षा फी नाही. अधिक माहिती ssc.nic.in येथे उपलब्ध

सैन्य भरती - औरंगाबाद जिल्ह्याची सोल्जर जीडी, टेक्निकल, क्लर्क, टेक्निकल, नर्सिंग, ट्रेड्समन, फार्मा इ. पदांसाठी पात्रता-8 वी/10 वी/12 वी/ डी फार्मा/एम फार्मा असून ठिकाण मुंब्रा-ठाणे असेल व रजिस्ट्रेशन 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत करावयाचे असून भरती- 13 डिसेंबर ते 23 डिसेबर 2019 या कालावधीत होणार आहे त्याकरिता औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार व परभणी इ जिल्हे सहभागी घेऊ शकतात. अधिक माहिती indianarmy.nic.in येथे उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस परीक्षा - 2 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून पदवी प्राप्त उमेदवारांकडून 3 नोव्हें 2019  पर्यंत  ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात upsc.gov.in येथे उपलब्ध होईल.

कोकण रेल्वे - 135 ट्रेनी अप्रेंटिस पदांकरिता संबंधित डिप्लोमा/ डिग्री उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज व 30 नोव्हेंबर 2019 प्रिंट पाठविणेची अंतिम तारीख आहे. अधिक माहिती konkanrailway.com येथे उपलब्ध.                            

संकलन - ज्ञानदेव भोपळे