Sun, Oct 20, 2019 06:00होमपेज › Edudisha › संधी नाेकरीची

संधी नाेकरीची

Published On: Apr 16 2019 2:13AM | Last Updated: Apr 16 2019 2:13AM
 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये - 8904 क्लार्क ग्रेड पदांकरिता जम्बो भरती करिता पदवी किंवा पदवीच्या शेवट वर्ष सुरू असलेल्या उमेदवारांकडून 3 मे 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांकरिता 22 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात sbi.co.in//carerrs येथे उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोग - 965 कम्बाईंड मेडिकल सेवातील पदांकरिता एम.बी.बी.एस. शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडून 6 मे 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात  upsc.gov.in येथे उपलब्ध.

प्रगत संगणक विकास केंद्र मुंबई - येथे प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोजेक्ट इंजिनियर्स पदांकरिता 26 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात cdac.in येथे उपलब्ध.

अलाहाबाद बँकमध्ये - विविध स्पेशालिस्ट ऑफिसर पदांकरिता 29 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात allahabadbank.in येथे उपलब्ध.

एअर इंडियामध्ये - 149 ट्रेनी कंट्रोलर व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरिता थेट मुलाखत 30 एप्रिल व 2 मे 2019 रोजी आयोजित केली आहे. अधिक माहिती airindia.in येथे उपलब्ध.

महाराष्ट्र एस. सर्व्हिसमन पुणे - येथे विविध पदांसाठी 30 एप्रिल 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात mescolted.co.in येथे उपलब्ध.

आय. डी.  बी. आय. बँकेत - 500 असिस्टंट मॅनेजर पदांकरिता पदवी 60 टक्के (मागासवर्गीयांना सवलत) उमेदवारांकडून 19 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून 17 मे 2019 रोजी परीक्षा घेतली जाईल. अधिक माहिती idbi.com येथे उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत - 50 सहायक जलविज्ञानी पदांकरिता संबंधित पदवी व किंवा पदव्युत्तर पदवी उमेदवारांकडून 2 मे 2019 ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  सविस्तर जाहिरात upsc.gov.in येथे उपलब्ध.

एम. पी. एस. सी.- गट क- संयुक्त पूर्व परीक्षा - पदे- लिपिक, टंकलेखक, राज्य उत्पादन शुल्क व कर सहायक पदांसाठी पात्रता पदवी /बसलेले असून पूर्व परीक्षा- 16 जून 2019 रोजी होणार आहे. जाहिरात- एप्रिल 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. अधिक माहिती mpsc.gov.in/1035/Home येथे उपलब्ध.

कर्मचारी निवड समिती - हजारो मल्टिटास्किंग पदांकरिता 10 वी पास उमेदवारांकडून 22 एप्रिल 2019 ते 21 मे 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन परीक्षा-2 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 पर्यंत होईल. कोल्हापूरसह महाराष्ट्रात 15 केंद्र उपलब्ध- एस.सी., एस.टी., महिला प्रवर्गाला परीक्षा फी नाही. अधिक माहिती ssc.nic.in येथे उपलब्ध.

जिल्हा परिषद - 13,621 महाभरती  पदांमध्ये अभियंता, तंत्रज्ञ, स्थापत्य सहायक, विस्तार  अधिकारी, आरोग्यसेवक /आरोग्यसेविका, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, औषध निर्माता, ग्रामसेवक, लिपिक व इतर पदांसाठी 16 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात mahapariksha.gov.in येथे उपलब्ध.

सिंडिकेट बँकेत - 129 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांकरिता 18 एप्रिल 2019  पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात syndicatebank.in येथे उपलब्ध.                

संकलन- ज्ञानदेव भोपळे