Wed, Nov 21, 2018 20:33होमपेज › Edudisha › कंपनी सेक्रेटरी बनायचंय?

कंपनी सेक्रेटरी बनायचंय?

Published On: Oct 22 2018 10:03PM | Last Updated: Oct 22 2018 9:11PMजागतिक आणि आर्थिक उदारीकरण धोरणामुळे कार्पोरेट सेक्टरचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कार्पोरेट क्षेत्रात विशेषज्ञांची मागणी वाढत चालली आहे. कंपनी सेक्रेटरी (कंपनी सचिव) हा विशेषज्ञ म्हणून ओळखला जातो. कंपनी सचिव हा कार्पोरेट क्षेत्रातील संचालक मंडळाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि कायदेविषयक बाबींशी निगडित असलेले विषय हाताळण्यासाठी महत्त्वाचा व्यक्‍ती मानला जातो. कंपनी सचिव पदावर असलेली व्यक्‍ती कंपनीतील सर्व विभागांशी समन्वय साधणारी असते आणि कंपनीची गरज ही संचालक मंडळापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. बैठक आयोजित करणे, संचालन करणे, आढावा घेणे, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी धोरण तयार करणे आदीविषयक महत्त्वाची जबाबदारी कंपनी सेके्रटरीला पार पाडावी लागते.