Mon, Nov 20, 2017 17:20होमपेज › Edudisha › ‘अ‍ॅडव्हान्स डिप्‍लोमा’ फायद्याचा

‘अ‍ॅडव्हान्स डिप्‍लोमा’ फायद्याचा

Published On: Nov 14 2017 2:22AM | Last Updated: Nov 13 2017 8:55PM

बुकमार्क करा

जगदीश काळे

अभ्यासक्रमांची उपलब्धता पाहून नेमका आपल्यासाठी कोणता उपयुक्‍त ठरेल, यासाठी विद्यार्थी संभम्रवास्थेत दिसून येतात. अशा स्थितीत बँकिंग अँड फायनान्सशी संबंध अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स करून आपण उत्तम करिअर करू शकता.

बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राचा विस्तार प्रचंड झाला आहे. डिजिटल तंत्रामुळे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राचा कायापालट झाला असून, त्यामुळे बँकिंग प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली आहे. खासगी, सहकारी आणि सरकारी पातळीवर बँक क्षेत्र विस्तारत चालले असून या क्षेत्राला आर्थिक क्षेत्राची जाण असणार्‍या तरुण मंडळींची गरज वाढत चालली आहे. 

आजघडीला बँकिंग क्षेत्रात असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध असून त्या माध्यमातून करिअरची नामी संधी उपलब्ध झाली आहे. अभ्यासक्रमांची उपलब्धता पाहून नेमका आपल्यासाठी कोणता उपयुक्‍त ठरेल, यासाठी विद्यार्थी संभम्रवास्थेत दिसून येतात. अशा स्थितीत बँकिंग अँड फायनान्सशी संबंध अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा कोर्स करून आपण उत्तम करिअर करू शकता. अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स कोर्सनुसार विद्यार्थ्यांना बँकिंग आणि फायनान्सचा कानमंत्र दिला जातो. उद्योगाशी संबंधित तांत्रिक कौशल्यही विकसित केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांत बँकिंग आणि आर्थिक संबंधित मुद्दे, प्रशासन, संघटनात्मक आणि व्यवहारिक सिद्धांत, बँकिंग आणि अर्थकारणाचे महत्त्व यासंबंधी सध्याचे पर्यायी आणि तांत्रिक भाषेचे अवलोकन होते. 

पात्रता : अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमाला 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे गरजेचे आहे. ज्यांना आर्थिक क्षेत्रात अधिक रूची आहे अशा मंडळींनी या क्षेत्रात करिअर करायला हरकत नाही. या क्षेत्रात पी.जी. डिप्लोमाचे महत्त्व अधिक आहे. कारण एका वर्षात अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीची हमी मिळते. बँक, विमा, वित्तीय सल्लागार संस्था, शेअर बाजार आदी क्षेत्रांत अशा मंडळींना मागणी वाढली आहे. 

संधी आणि वेतन : अशा प्रकारच्या प्रोफेशनल्सची गरज अनेक एमएनसी, खासगी बँका आणि वित्तीय संस्थेत भासते. सुरुवातीला या संस्थांकडून किमान वीस ते तीस हजार मासिक वेतन दिले जाते. अनुभवाच्या आधारावर वेतनात वाढ होत जाते. अनेक विद्यार्थ्यांना तर कॉलेज कॅम्पसमधूनच चांगल्या ऑफर्स मिळतात. 

अभ्यासक्रमाचे स्वरूप : अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स अंतर्गत बँकिंग ऑपरेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल मार्केट अँड इन्स्टिट्यूट, फायनान्शियल ट्राजेक्शन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, रिसर्च मेथड अँड इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, ऑर्गनायजेशनल बिहेविअर यासंदर्भात शिकवले जाते. यातून बँकिंग आणि फायनान्ससंबंधी चांगले ज्ञान अवगत होते. 

बँकिंग ऑपरेशन : बँकिंग अँड फायनान्स पदवी अभ्यासक्रमांतर्गत बँकिंग ऑपरेशनची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांना बँकिंग ऑपरेशनसंबंधी तथ्यांची माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना बँकिंग ऑपरेशन, रिव्हू कंपटेटिव्ह स्ट्रटेजिज आणि बँक सर्व्हिससंबंधी माहिती दिली जाते. बाजाराची ठोक निती आणि इंटरनॅशनल बँकिंगसंबंधी माहितीचा समावेश या अभ्यासक्रमात आहे.

फायनान्शियल मॅनेजमेंट : या विषयाचा उद्देश विद्यार्थ्यांना बिझनेस आणि फायनान्ससंबंधी वैचारिक पातळी उंचावणे होय. याशिवाय बिझनेस फायनान्सचे विश्‍लेषण आणि मूल्यांकन व्यवहारिक पातळीवर कसे करता येईल, याचीही माहिती दिली जाते. फायनान्शियल मॅनेजमेंट फंडचा उपयोग सहायक म्हणून कसा होतो, याचीही माहिती अभ्यासक्रमात दिली जाते. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट : बँकिंग आणि फायनान्सचे सिद्धांत योग्य तर्‍हेने कसे लागू करता येतील, याचे मॉड्यूल सांगितले जाते. यासंबंधी संपूर्ण माहिती इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये दिली जाते. 

रिसर्च मेथड : हे मॉड्यूल विद्यार्थ्यांच्या सायंटिफिक मेथड आणि डिझाईन रिसर्चची गरज विकसित करण्यात मदत करते. फायनान्शियल मार्केट आणि इन्स्टिट्यूट या मॉड्यूलचा उद्देश अनेक बाजारपेठा, उपकरणाची उपलब्धता, इन्स्ट्रूमेंटस् आणि संस्थांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणे होय. 

प्रमुख संस्था : देशात अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स आणि तत्सम अभ्यासक्रम शिकवणारे विद्यापीठ पुढीलप्रमाणे सांगता येतील.

• इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
• मणिपाल युनिव्हर्सिटी, कर्नाटक
• सिम्बॉयसिस इंटरनॅशल युनिव्हर्सिटी, मुंबई
• टीकेडब्ल्यूएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड 
 फायन नवी दिल्ली.