Mon, Jan 20, 2020 09:22होमपेज › Belgaon › वादग्रस्त पोस्ट करणार्‍याची धुलाई

वादग्रस्त पोस्ट करणार्‍याची धुलाई

Published On: Mar 03 2019 12:48AM | Last Updated: Mar 02 2019 11:27PM
बेळगाव : प्रतिनिधी

रामदुर्ग (जि. बेळगाव) येथील माजी आमदारांच्या निकटवर्तीयाने पाकिस्तान आपला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्याने त्याला स्थानिकांनी मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला असून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहम्मद शफी बेन्‍ने असे जखमी संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 10.12 वा. त्याने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर पाकिस्तानची वाहवा करणारा मजकूर लिहिला. ‘जै पाकिस्तानहमारा है, अशोक अण्णा हमारा, रामदुर्ग डॉन हमारा’ असे त्याने लिहिले. या घटनेनंतर त्याच्या पोस्टवर सुमारे 350 कमेंट्स आल्या. त्यामध्ये प्रत्येकाने त्याची कानउघाडणी केली आहे. अशा देशद्रोही पोस्टमुळे आपल्या भावना दुखावल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काहीजणांनी त्याला मारहाण केली. यामध्ये त्याच्यासह आणखी एकजण जखमी झाला. त्या जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली असताना अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करु नये म्हणून जागृती करण्यात येत आहे. तरीही संशयिताने वादग्रस्त पोस्ट केली. याबाबत संशयिताने दिलेल्या माहितीनुसार त्याचे अकाऊंट हॅक झाले आहे.