Mon, Jan 20, 2020 09:22होमपेज › Belgaon › कुमारस्वामी बेजबाबदार मुख्यमंत्री!

कुमारस्वामी बेजबाबदार मुख्यमंत्री!

Published On: Mar 11 2019 1:26AM | Last Updated: Mar 11 2019 1:26AM
चिकोडी : प्रतिनिधी

केंद्र पैसे देत असताना राज्य सरकारकडून पैसे लुटण्याचे काम होत आहे. कुमारस्वामी बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात 25 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुराप्पा यांनी केले.

सीएलई संस्थेच्या प्रांगणात आयोजित भाजपा चिकोडी लोकसभा मतदारसंघात मोदी विजय संकल्प मेळावा झाला.

ते म्हणाले, मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून निजद व काँग्रेसने आघाडी केली. त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.  चिकोडी लोकसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक मताधिक्याने भाजप उमेदवारास निवडून द्यावे.
श्यामाप्रसाद मुखर्जींचे ऐकले असते तर आज जम्मू काश्मिरची समस्या निर्माण झाली नसती. आज विंग कमांडर अभिनंदनचे धैर्य आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे. 

राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, एअर स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तान मान्य करत असताना सैन्यांवर काँग्रेसने अविश्‍वास दाखविणे चुकीचे आहे. या निवडणुकीत चिकोडीतील भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम व्हावे, असेही ते म्हणाले.
माजी खा. रमेश कत्ती म्हणाले, काँग्रेसने नेहमी देश लुटण्याचे काम केले. तरुण पिढीचे भवितव्य व देश रक्षणासाठी भाजपला मतदान करावे.निपाणीच्या आमदार शशीकला जोल्ले, आ. पी. राजीव, माजी मंत्री मुरुगेश निराणी, लक्ष्मण सवदी, संजय पाटील, मारुती अष्टगी, इरण्णा कडाडी, अमरसिंह पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. निपाणीचे नगरसेवक राजू गुंदेशा यांनी भाजपात प्रवेश केला. व्यासपीठावर माजी मंत्री आ. उमेश कत्ती, आण्णासाहेब जोल्ले, आ. दुर्योधन ऐहोळ, पवन कत्ती, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाईक, जगदीश कवटगीमठ, जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, लक्ष्मी कुरबर उपस्थित होते. विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी प्रास्ताविक केले. गुरुराज कुलकर्णी यांनी आभार केले.