Fri, Feb 22, 2019 13:57होमपेज › Belgaon › कराडात पादचार्‍यांचा जीव मुठीत

कराडात पादचार्‍यांचा जीव मुठीत

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 13 2018 1:15AMकराड : प्रतिनिधी

शहरातील कोल्हापूर नाक्यावरील पोपटभाई पेट्रोल पंपापाठीमागे असणार्‍या रस्त्यावर वाहतूकीचा प्रचंड ताण पडत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने पादचार्‍यांना अक्षरश: मुठीत जीव घेवून चालावे लागत आहे. 

कोल्हापूर नाक्यावरून शहरात प्रवेश केल्यानंतर पोपटभाई पेट्रोलपंपाशेजारी असणारा सिग्नल टाळण्यासाठी पंपाच्या पाठीमागे असणार्‍या रस्त्यावरून सातारा मार्गे येणारी वाहने, कोल्हापूर नाक्यावरून येणारी वाहने तसेच शहरातून येणारी वाहने पंकज हॉटेलमार्गे  येˆजा करत असतात. या वाहतूकीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर लाहोटी प्लाझा समोरून जाणारी वाहनेही याच रस्त्यावरून वळत असल्याने याठिकाणी तीन रस्त्यांचा चौक तयार झाला आहे. याठिकाणाहून रस्ता क्रॉस करणे म्हणजे अत्यंत मुश्किल होते. वाहने तिन्ही बाजूंनी येˆ जा करत असल्यामुळे नक्की कोणत्या बाजूने रस्ता क्रॉस करावा हेच पादचार्‍यांना कळत नाही. तिन्ही ठिकाणाहून वाहने ये  ˆ जा करत असल्यामुळे या रस्त्यावरून येˆ जा करणार्‍या पादचार्‍यांना अक्षरश: जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तसेच याठिकाणी वाहतूकीची अनेकदा कोंडी होत असल्याने पादचार्‍यांना चालण्यासाठी रस्ता शिल्लक रहात नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. अनेकदा पालिकेने या खड्यांमध्ये मुरूम, खडी  भरून तात्पुरती  मलमपट्टी केली आहे. मात्र पक्के डांबरीकरण नसल्याने ही खडी उखडून रस्त्यावर येत आहे. परिणामी पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. पावसाळ्यात तरी याठिकाणी परिस्थिती अत्यंत दयनीय असते. 

पार्किंगला शिस्त लागणे आवश्यक

या रस्त्यावर येˆ जा करणार्‍या वाहनांच्या संख्येबरोबरच याठिकाणी असणारी हॉस्पिटल, दुकाने, हॉटेल यामुळे ग्राहकांची, रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केलेली असतात. मुळातच हा रस्ता रूंदीस लहान आहे. त्यातच याठिकाणी पार्क केलेली वाहने यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीस हातभार लागत आहे.   त्यामुळे पाकिर्र्ंगची शिस्त याठिकाणी करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.