Sun, Oct 20, 2019 11:51होमपेज › Belgaon › सीमोल्लंघन जल्लोषात

सीमोल्लंघन जल्लोषात

Last Updated: Oct 10 2019 12:15AM
बेळगाव : प्रतिनिधी

ज्योती कॉलेजच्या मैदानावर मंगळवारी सीमोल्लंघन गर्दीत झाले. बेळगावकरांनी एकमेकांना सोने वाटून सोन घे सोन्यासारखे रहा, असा संदेश देत शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदा शहर देवस्थान कमिटीतर्फे मैदानावर पालखी वाजत गाजत आणण्यात आली. शहरातील सासनकाठ्यासुद्धा मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. शहरातील मंदिराना भेट देत पालखी मैदानाच्या दिशेने संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आली. 

पालखीच्या अग्रभागी ढोल वाजवत गाजत सीमोल्लंघनाच्या दिशेने निघाले होते. जोतिबाच्या नावाने सोडलेल्या कटल्या बैलाला फुलांच्या माळांनी सजवून सीमोल्लंघन मैदानावर आणण्यात आले होते. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण- पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. पूजनानंतर कटल्याला उधळण्यात आले. आपट्याची पाने उधळून कटल्या पुढे गेल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसगी आ. अ‍ॅड. अनिल बेनके, पोलिस आयुक्त लोकेशकुमार, एसीपी नारायण बरमणी, सीपीआय धीरज शिंदे, जे. एम. कालीमिर्ची, रमाकांत कोंडूसकर, विकास कलघटगी, परशराम माळी, विजय तम्मूचे, आनंद आपटेकर, रोहन जाधवसह मान्यवर उपस्थित होते.

कॅम्पमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त पूजवण्यात आलेल्या देवींची मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकातून देवीची मिरवणूक यंदेखुटातून पुन्हा वनिता विद्यालयासमोरुन युनियन जिमखान्याजवळून पुन्हा कॅम्पमध्ये वळवण्यात आली. सीमोल्लंघनानंतर भक्तांनी पालखीत आपट्याची पाने वाहून दर्शन घेतले.