Mon, Jan 20, 2020 09:24होमपेज › Belgaon › ‘चौकीदार’100 टक्के चोर; राहुल यांचा मोदींवर घणाघात

‘चौकीदार’100 टक्के चोर; राहुल यांचा मोदींवर घणाघात

Published On: Apr 14 2019 12:38AM | Last Updated: Apr 14 2019 12:38AM
कोलार ः वृत्तसंस्था

स्वतःला देशाचा चौकीदार समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंभर टक्के चोर आहेत, असा घणाघात राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकातील कोलार येथे शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या जाहीर प्रचारसभेत त्यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

 ‘मोदी’ या आडनावाबाबत राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेताना ‘मला एक समजत नाही, की मोदी या आडनावाचे हे चोर का असावेत? मग, या पंक्तीमध्ये नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी असेनात! असे अजून किती मोदी या आडनावाचे चोर म्हणून पुढे येणार आहेत?’, अशी साशंकताही राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 

बहुचर्चित राफेल कराराचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी या ‘राफेल’मध्ये तब्बल 30 हजार कोटी रुपये लाटून त्यांचे जवळचे मित्र अनिल अंबानी यांना एक प्रकारची ‘गिफ्ट’ दिली आहे . निरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांची मिळून एक चोरांची टोळी आहे आणि हे सर्वजण मिळून देशाची राजरोसपणे लूट करीत आहेत, असे शरसंधान राहुल गांधी यांनी साधले.

या देशातील बेरोजगारी, कष्टकरी शेतकरी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी अद्याप चिडीचूप आहेत, असे सांगून राहुल म्हणाले, आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करीत आलो आहोत. कधीही स्वार्थासाठी खोटे बोलत नाही.

आमचे सरकार सत्तेवर आले, तर आम्ही ‘न्याय’ या योजनेमधून प्रत्येक शेतकर्‍याला वर्षाला 72 हजार रुपये देेणार. त्याचबरोबर संसद, विधानसभा आणि सर्व सरकारी नोकर्‍यांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध आहोत.
राहुल गांधी, अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस