Sun, Dec 15, 2019 05:56होमपेज › Belgaon › ‘त्यांना’च पेपर तपासणीच्या धड्यांची गरज? 

‘त्यांना’च पेपर तपासणीच्या धड्यांची गरज? 

Published On: May 05 2019 12:56AM | Last Updated: May 05 2019 12:14AM
संकेश्‍वर ः प्रतिनिधी

निवडणुकीच्या तोंडावर शिक्षण विभागाने पदवीपूर्व परीक्षेच्या पेपर मूल्यांकनाचे काम युद्धपातळीवर सुरु केले होते. यामध्ये उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन झाल्यानंतर ऑनलाईन गुणांची नोंद केली जात होती. पण तज्ज्ञ मूल्यमापकांकडून मूल्यांकन करून घेतल्या नसल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पालकांनी मागविलेल्या उत्तरपत्रिकांच्या फोटो प्रतीमुळे उघडकीस आला आहे . 

दहावी किंवा बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनाच्या  कसोटीचे  काही सामान्य निकष ठरलेले आहेत. या सामान्य निकषांचीही माहिती उत्तरपत्रिका मूल्यमापकाला नसल्याचे उघड झाले आहे. यामध्ये उत्तरपत्रिका मूल्यमापन करताना उत्तर चूक किंवा बरोबर याची नोंद उत्तर पत्रिकेमधील समासामध्ये करावयाची  असते. गुणांची नोंदही समासामध्ये करावयाची असते. मूल्यमापकाकडून मूल्यमापनामध्ये चुकांची आणि खाडा खोडीची अजिबात अपेक्षा नसते परंतु अशा चुका घडल्याचे उघड झाले आहे 

पीयुसी मूल्यमापन करताना दिलेल्या गुणांमध्ये खाडाखोड झालेली आहे. त्याचबरोबर चूक केलेल्या चिन्हामध्येही खाडाखोड करण्यात आलेली आहे. तसेच या खुणा लिहिलेल्या उत्तरामध्ये करण्यात आलेल्या  आहेत. अशा उत्तरपत्रिका  पुनर्मूल्यमापन करण्यासाठी अर्ज आल्यास या  उत्तरपत्रिका  पुनर्मुल्यमापन न करता  नो चेन्ज  म्हणून पाठविल्या 
 जातात. 

यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांचे  कष्ट आणि वेळ ही वाया जाते याचे विभागाला काहीही देणे घेणे नसते. पुनर्मुल्यमापनासाठी अशा मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिका ही अवघड बाब असते. कारण  अशा उत्तरपत्रिका  ‘डीकोडिंग’ करणे अवघड  असते. 

नवोदित मूल्यमापकांनी मूल्य मापन करताना शिक्षण विभागाने दिलेल्या उत्तरपत्रिकांच्या आधारे तंतोतंत मूल्यमापन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेत लिहिलेल्या पण  योग्य उत्तराला योग्य  न्याय मिळालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांनी मागविलेल्या उत्तरपत्रिकांची पाने गहाळ झालेली आहेत. आज हजारो  विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत .