Sat, Dec 14, 2019 05:37होमपेज › Belgaon › लिंगायत पद्धतीने केला मुस्लिम कुटुंबाने गृहप्रवेश

लिंगायत पद्धतीने केला मुस्लिम कुटुंबाने गृहप्रवेश

Published On: May 07 2019 1:57AM | Last Updated: May 06 2019 11:23PM
बेळगाव : प्रतिनिधी

बैलहोंगल तालुका होळी होसूर गावातील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घराची वास्तूशांत गृहप्रवेश हा लिंगायत पद्धतीने केला. लिंगपूजा व बसवेश्‍वरांची वचने गायली गेली.

नेगीनहाळच्या मडिवाळेश्‍वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामी यांनी रविवारी हुसेन जमादार यांच्या गृहप्रवेश लिंगपूजा व वचने गाऊन पूर्ण केला. भागात या विषयाची चर्चा सुरू आहे. गृहप्रवेशावेळी विश्‍व गुरु बसवेश्‍वर, साधूसंतांचे फोटो, वचनसंग्रह, कुराण आदी ठेवून पूजा करण्यात आली. सामूहिक लिंगपूजा व सामूहिक प्रार्थना करून अगदी साधेपणाने हा कार्यक्रम पार पाडला. लिंगायत व मुस्लीम धर्मात बरेचसे साम्य आहे. बसवेश्‍वरांची तत्वे या कुटुंबाने फार जवळीकतेने हाताळलेली  असल्याने यांनी लिंगायत पद्धतीने गृहप्रवेश केल्याचे समजते. मुस्लीम समाजातील या कुटुंबाने लिंगायत धर्माचे पालन करून लिंगयात बांधवांना एक चांगलाच धार्मिक धडा शिकविला आहे. असे मत बसवसिद्धलिंग स्वामींनी व्यक्त केले.

लिंगायत धर्मात अष्टावरण, पंचाचारण असून इस्लाम धर्मात षरियत, तरीकत, हकीकत, नियाकत असे  विधी आहेत, असे मंजुनाथ मडिवाळर यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिक्षक बसवराज हुबळ्ळी, मडिवाळप्पा गौरी, महोदव मुद्दण्णवर, नागराज, कुंकूर, नागप्पा तुरमरी, गवीगेप्पा रामोजी, बसवराज हडपद उपस्थित होते.