होमपेज › Belgaon › महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्‍नी भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या राज्यपालांची माहिती

महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्‍नी भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या राज्यपालांची माहिती

Published On: Feb 26 2019 1:16AM | Last Updated: Feb 25 2019 11:09PM
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍नी सरकारने दावा केलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक जनतेचे घटनात्मक हक्‍क व विशेषाधिकाराबाबत महाराष्ट्र सरकार संवेदनशील आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात सातत्याने एक ठाम भूमिका मांडली जात असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी आपल्या अभिभाषणात सांगितले.

महाराष्ट्र राज्य  विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. यावेळी राव यांनी विधिमंडळाच्या संयुक्‍त सभागृहापुढे केलेल्या अभिभाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.