Sun, Dec 08, 2019 22:24होमपेज › Belgaon › जयनगरमध्ये शांततेत 55 टक्के मतदान

जयनगरमध्ये शांततेत 55 टक्के मतदान

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:03AMबंगळूर : प्रतिनिधी

जयनगर विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी 55 टक्के मतदान कोणतीही अनुचित घटना न घडता शांततेत पार पडले. भाजपचे उमेदवार व माजी आमदार बी. एन. विजयकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे निवडणूक पुढे ढकलून ती 11 जूनला निवडणूक आयोगाने घेण्याचे जाहीर केले होते. 

माजी गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी काँग्रेसच्या उमेदवार असून, प्रल्हाद बाबू भाजपचे उमेदवार आहेत. आम आदमी पक्षाचे रविकृष्ण रेड्डी, निजदचे काळेगौडा व एमएपीचे उमेदवार सईद जब्बे यांनी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. मतमोजणी 13 जून रोजी होणार आहे.