Sun, Dec 15, 2019 05:55होमपेज › Belgaon › 'पाकिस्‍तान की जय' पोस्‍ट टाकणार्‍या शिक्षिकेला अटक

'पाकिस्‍तान की जय' पोस्‍ट टाकणार्‍या शिक्षिकेला अटक

Published On: Feb 17 2019 3:45PM | Last Updated: Feb 17 2019 5:43PM
बेळगाव : प्रतिनिधी

काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने पोस्ट टाकणार्‍या ऊर्दू शिक्षिकेला मुरगोड पोलिसांनी अटक केली. जेलिका ममदापूर (रा. कडबी शिवापूर, ता. सौंदत्ती) शिक्षिकेचे नाव असून, तिच्यावरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तिचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

अधिक वाचा : सुरक्षा हटवली; फुटीरवादी नेते म्हणतात, मागितलीच नव्हती..

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जिलेका ही एका खासगी ऊर्दू शाळेत शिक्षिका आहे. पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये पाकिस्तान की जय हो, असे म्हटले आहे, शिवाय तिने आपल्या व्हॉटस्अ‍ॅपचा डीपीदेखील देशविरोधी ठेवला आहे. ही देशविरोधातील पोस्ट व तिचा डीपी व्हायरल झाल्यानंतर सौंदत्ती तालुक्यासह तिच्या गावात कडबी शिवापूर येथे संतापाची लाट उसळली आहे. यानंतर या तरुणीला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. चिडलेल्या ग्रामस्थांनी या तरुणीचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला रोखले. यावेळी सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी सांगितले. गावात तणावपूर्ण शांतता असून, आज रविवारी मुरगोडमध्ये बंद पाळण्यात आला आहे. 
 

अधिक वाचा : पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान यांना टी-सीरिजचा दणका