Mon, Sep 16, 2019 05:43होमपेज › Belgaon › भीषण अपघात; ६ ठार

भीषण अपघात; ६ ठार

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 19 2019 1:33AM
अंकली : वार्ताहर

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराहून परत येताना टाटा एस वाहन उलटून  झालेल्या अपघातात दोन महिलांसह सहाजण जागीच ठार, तर 10 जण जखमी झाले.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील कंदगनूर गावाजवळ शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींना  मुद्देबिहाळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मृत बागलकोट जिल्ह्यातील गुळेदगुड तालुक्यातील हलदूर खेड्यातील आहेत. आपल्या नातेतवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी ते मुद्देबिहाळला टाटा एस वाहनातून गेले होते. अपघाताची नोंद मुद्देबिहाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.