जांबोटी : वार्ताहर
कणकुंबीतील कळसा प्रकल्पाचे काम बंद असताना चालू असल्याचा आरोप करून गोवा जलसंपदामंत्री विनोद पालयेकर यांच्याकडून गोव्याच्या जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा पलटवार कर्नाटक पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील यांनी सोमवारी केला.
सुरू असलेले काम जुनेच आहे. ऑगस्टनंतर कोणतेच काम हाती घेतलेले नाही. हवे तर बाहेरील तज्ज्ञांकडून पाहणी करुन घ्यावी, असे आव्हान पाटील यांनी दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हादईवरून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.गोव्याचे जलसंपदामंत्री पालयेकर यांनी कळसा प्रकल्पाची पाहणी केली.
या दरम्यान म्हादई जल लवादाची बंदी असताना कर्नाटकाकडून काम सुरुच ठेवले असून न्यायालायाचा अवमान केल्याचा आरोप पत्रकार परीषदेत केला. याची दखल घेत मंत्री ए.बी.पाटील यांनी कणकुंबीत धाव घेवून कळसा कालव्याच्या कामाचा आढावा घेतला.