Wed, Jun 26, 2019 15:45होमपेज › Belgaon › विद्यमान खासदारांनाच उमेदवारी

विद्यमान खासदारांनाच उमेदवारी

Published On: Mar 11 2019 1:26AM | Last Updated: Mar 10 2019 11:43PM
बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकामध्ये एखादा बदल वगळता विद्यमान खासदारांनाच भाजपतर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. 

चिकोडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी त्यांचे रविवारी सकाळी येथील सांबरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. 

ते म्हणाले, कर्नाटकमध्ये एखाद्या ठिकाणी वगळता सर्वच विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात येणार असून भाजप 22 हून अधिक जागा मिळवेल. लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येतील. 
यावेळी खा. सुरेश अंगडी, आ. अनिल बेनके, आ. अभय पाटील आदी उपस्थित होते.

काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळणार

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळणार यात शंकाच नाही, असे भाकीत येडियुराप्पा यांनी वर्तवले. सत्तेसाठी ही अभद्र युती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे सरकार सत्तेवर राहणार नाही. अंतर्गत तक्रारीमुळेच हे सरकार कोसळणार आहे.