Sat, Aug 24, 2019 10:42होमपेज › Belgaon › इनोव्हाची डंपरला धडक : दोघे गंभीर

इनोव्हाची डंपरला धडक : दोघे गंभीर

Published On: Jan 26 2019 1:11AM | Last Updated: Jan 25 2019 10:58PM
कोगनोळी : वार्ताहर

येथील राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीनजीक इनोव्हा कार व डंपर ट्रक समोरासमोर एकमेकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघेगंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

जखमींवर कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इनोव्हा कार कोल्हापूरहून बेळगावकडे जात होती. कोगनोळी टोलनाका चुकवण्यासाठी कोगनोळी गावातून डंपर जात होता. सर्कलमध्ये रस्ता क्रॉस करण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची एकमेकाला धडक बसली. अपघातात इनोव्हा कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाहीत.