होमपेज › Belgaon › डॉक्टरांचे आंदोलनास्त्र

डॉक्टरांचे आंदोलनास्त्र

Published On: Nov 15 2017 1:46AM | Last Updated: Nov 14 2017 11:52PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारने खासगी डॉक्टरांच्या सेवाशुल्क (केपीएमईए) निश्‍चित करण्यासंदर्भात दुरुस्ती विधेयक या अधिवेशनात संमत करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या विधेयकाला विरोध दर्शवत राज्यभरातील हजारो खासगी डॉक्टर्सनी सोमवारपासून सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडले आहे. आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस होता. मात्र, सरकारने याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याने डॉक्टरांनी साखळी उपोषण आरंभिले आहे.

राज्य सरकारने या हिवाळी अधिवेशनात केपीएमईए या दुरुस्ती विधेयकाला संमती मिळविण्यासाठी सभागृहात चर्चेला घेण्याची तयारी चालविली आहे. यावरून हे विधेयक खासगी डॉक्टरांसाठी मारक ठरणार असून, यामुळे अनेक डॉक्टरांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी हे विधेयक रद्द करण्यात यावे आणि निवृत्त न्यायाधीश विक्रमजीत सेन यांच्या अहवालाची पाहणी आदी करावी. या विधेयकामुळे खासगी डॉक्टरांवर मोठे गंडांतर येणार आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

आंदोलनस्थळी खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी भेट देऊन संघटनांच्या डॉक्टरांशी संवाद साधला तर हे विधेयक मंजूर झाल्यास राज्यभरातील सर्व खासगी इस्तितळांमधील सेवा बंद ठेवून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टर्स संघटनांनी घेतला आहे.