Sun, Dec 08, 2019 22:29होमपेज › Belgaon › दळवी, संभाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा 

दळवी, संभाजी पाटील यांच्याविरोधात गुन्हा 

Published On: Apr 24 2019 1:36AM | Last Updated: Apr 24 2019 1:36AM
बेळगाव : प्रतिनिधी

आचारसंहितेचा भंग करत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप करत मध्यवर्ती म.ए .समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व माजी आमदार संभाजी पाटील यांच्यावर मंगळवारी खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 21 एप्रिल रोजी दीपक दळवी यांनी रामलिंग खिंड गल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. त्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर फ्लाईंग स्क्‍वॉड अधिकारी श्रीकांत लमाणी यांनी त्यांच्याविरोधात भाषिक तेढ व आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तक्रार जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे केली होती.

माजी आमदार संभाजी पाटील यांनीही भाषिक तेढ निर्माण केले, भाषावार प्रांत रचनेसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा ठपका ठेवत नोटीस दिली. या दोन्ही नोटिसांनुसार मंगळवारी दोघांविरोधात खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मारुती गुळ्ळारी अधिक तपास करीत आहेत. 

अंगडी समर्थकांवरही गुन्हा 

जाहीर प्रचार संपलेला असताना फेसबुकवर प्रचार करीत असल्याचा ठपका खा. सुरेश अंगडी व त्यांच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेसने ठेवला. यासंबंधीची फिर्याद एपीएमसी पोलिसांत दिल्यानंतर अंगडींसह समर्थकांविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.